केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जानेवारी 2024 मध्ये? TET परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीनेच!

 शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 साठी जिल्हा परिषदेतील पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहे परंतु ही परीक्षा अजून झाली नाही वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून काही शिक्षकांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

परंतु आता केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जानेवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत बातमीमध्ये परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी TET  परीक्षा आता यापुढे ऑनलाईनच होणार असे स्पष्ट केले आहे ही परीक्षा कधी होणार याबाबत सांगताना त्यांनी त्या अगोदर केंद्रप्रमुख पदासाठी परीक्षा देखील घेण्यात येणार आहे असे स्पष्ट केले आहे.

अगोदर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा होईल व त्यानंतर टीईटी परीक्षा होईल असे वृत्तपत्रातील बातमीत सांगण्यात आले आहे सविस्तर बातमी पुढील प्रमाणे.



पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा

परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दर वर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर, अभियोग्यता  बुद्धिमापन चाचणी, तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सिटीईटी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी देखील ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी संबंधित परीक्षा देणारे उमेदवार करीत होते. त्यानुसार आता परीक्षा परिषदेने परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेश पत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या मर्व नेसाठी हा कालावधी देण्यात य असतो. जानेवारी महिन्यात सिटीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच केंद्रप्रमुख पदाची परीक्षादेखील घेण्यात येणार आहे.



ऑनलाइन मार्गदर्शन रोज सायंकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत असेल तसेच कोर्स सोबत आपणास pdf  नोट्स,  रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आणि टेस्ट सिरीज मिळेल...

कोर्स सोबत आपणास  मित्र प्रकाशन कोल्हापूर यांचे 250/- किमतीचे 10 प्रश्नपत्रिका संच असणारे पुस्तक मोफत मिळेल..  कोर्स लिंक.

https://chbxo.on-app.in/app/oc/407545/chbxo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.