विस्तार अधिकारी शिक्षण पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा 2 नोव्हेंबर 2023 रोजीच होणार! जिल्हा परिषदेची सूचना..

 मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असल्यामुळे जिल्हा परिषद पद भरती सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात येतील का याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 


मात्र धाराशिव जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने एक प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध करून परीक्षा ठरलेल्या वेळेवरच होणार आहे काही अडचण आल्यास दिलेल्या संपर्क संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे. 


सरळसेवा पदभरती सन-2023 बाबत जाहिर आवाहन


जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन 2023 साठी दि. 1 नोव्हेंबर, 02 नोव्हेंबर व दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी विविध 6 संवर्गासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदरील ऑनलाईन परिक्षा या ठरलेल्या दिनांकास वेळेवर होणार आहेत. धाराशिव जिल्हयात सध्या संचारबंदी लागू असून जे परिक्षार्थी हे धाराशिव शहरातील नमूद परिक्षा केंद्रावर परिक्षा देणार आहेत, त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेवर ऑनलाईन परिक्षेसाठी परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावयाचे आहे. परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी आपणाकडील परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र दर्शविण्यात यावे, याउपरही काही अडचण आल्यास जिल्हा परिषद धाराशिव सामान्य प्रशासन विभागाकडील दुरध्वनी क्रमांक 02472- 223388 वर मोबाईल क्रमांक 8380945077 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे. यांचे मान्यतेने


(सुर्यकांत भुजबळ)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.