महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीचे पॅनल नियुक्तीचा दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी चा कंत्राटीकरण संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्याबाबत पुढील प्रमाणे दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून निर्देश दिले आहेत.
कामगार विभागाने, कामगार आयुक्तालय व कामगार विभागाच्या अधिनस्त असलेल्या इतर कार्यालयांसाठी बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यासाठी दिनांक १८.०६.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मे. ब्रिस्क फॅसिलिटिज प्रा.लि. व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या दोन निविदाकारांच्या पॅनलला तीन वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. सदर पॅनलवरील पुरवठादाराच्या सेवा घेण्यासाठी इतर विभागांना मुभा देण्यात आली होती.
२. सदर कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर पॅनलला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ दि. १८.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये संपुष्टात आणण्यात आली आहे.
3. दरम्यानच्या काळात पुरवठादाराचे नवीन पॅनल नियुक्त करण्यासाठी कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने दि. ०२.०९.२०२१ ते दि. २७.०४.२०२२ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली. सदर निविदा प्रक्रियेमध्ये एकूण २६ निविदाकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी निविदा समितीने १० निविदाकारांना पात्र ठरविले होते. त्यानुसार प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेऊन त्यास मान्यता घेण्यात आली. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे १० निविदाकारांपैकी एक एजन्सी वगळून नऊ (९) एजन्सींचे पॅनल तयार करणे तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर पॅनलवरील सेवापुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग/ निमशासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्था/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ इतर आस्थापना इ. यांना बंधनकारक करण्यात आले आहे. सदर पुरवठादारांच्या पॅनलमध्ये १) अॅक्सेंट टेक सर्व्हिसेस लि.
२) सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. ३) सी.एस.सी. ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. ४) इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि. ५) क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. ६) इन्फोटेक इंटरनॅशनल लि. ७) सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. ८) सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा.लि. ९) उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या ९ एजन्सींचा समावेश होता.
शासन निर्णयः -
या विभागाचा वाचा येथे नमूद दि.०६.०९.२०२३ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय रद्द करीत असल्याने विविध शासकीय विभागांना/ कार्यालयांना या विभागाच्या २०२१ मध्ये निविदा प्रक्रिया राबविलेल्या व दि.०६.०९.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्त पॅनलवरील एजन्सीकडून दि.२१.१०.२०२३ पासून मनुष्यबळाच्या सेवा घेता येणार नाही. संबंधित शासकीय विभागांनी/कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर आवश्यकतेनुसार नियोजन करावे.
ज्या शासकीय विभागांनी/ कार्यालयांनी या विभागाच्या दि. ०६.०९.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे मनुष्यबळाच्या सेवा घेतल्या असतील त्या विभागांनी/ कार्यालयांनी दि. २१.१०.२०२३ पासून ९ महिन्याच्या आत मनुष्यबळाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा रितीने संपुष्टात आणाव्यात.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०३११७०००२२३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(दिपक पोकळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments