Important Update - यु-डायस प्लस 2023-24 बाबत महत्त्वाची सूचना...

 यु-डायस  प्लस बाबत महत्त्वाची सूचना



मा. सहसंचालक (प्रशा), मप्राशिप, मुंबई व‌ मा. शिक्षण उपसंचालक, अमरावती यांनी दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी VC व्दारे घेतलेल्या आढावा सभेतील सूचनेनुसार,

(१) सर्व विद्यार्थ्यांचे प्रोफाइल अपडेशन (GP, EP, FP) दिनांक 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण करावे.

(२) तसेच सर्व शाळांचे शाळा व शिक्षक प्रोफाइल दि. १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करुन करावे.

या अनुषंगाने समग्र शिक्षा व नियमित पर्यवेक्षिय कार्यरत कर्मचारी यांच्याकडे जबाबदारी निश्चित करुन शाळा/केंद्र निहाय सुक्ष्म नियोजन करावे तसेच दैनिक आढावा घ्यावा..


इ १ ली वगळता उर्वरित इयत्ता मधील विद्यार्थी यु-डायस मध्ये समाविष्ट करावयाचे राहीले असल्यास त्यांची यादी तुमच्या स्तरावर प्राप्त करून ठेवावी.


आधार नसलेल्या विद्यार्थी नोंद घेण्यासाठी आधार नंबर ऐवजी बारा वेळा ९ चा वापर करावा. तसेच संबंधित शिक्षक/पालकांना आधार काढण्यासाठी कळवावे.. भविष्यात लाभा पासून विद्यार्थी वंचित राहील्यास याची जाणीव संबंधित शिक्षक /पालकांना करुन द्यावी..


काही ठराविक प्रर्वगातील विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नाही.‌अशा बाबतीत शून्य नमुद करुन नोंद घ्यावी..


ड्रॉप बॉक्सचे विश्लेषण करुन ड्राप बॉक्स मध्ये शून्य विद्यार्थी असतील हे बघावे.

शाळांना येणाऱ्या अडचणीचे आपल्या स्तरावरुन तात्काळ निरसन करून विहीत मुदतीत काम पुर्ण करुन होईल या अनुषंगाने आपण सुद्धा शाळेशी वैयक्तिक संपर्क साधावा..

एखाद्या शाळेचे सहकार्य / अडचण असेल तर प्रशासनाला कळवणे.. सोबत नांव व मोबाईल नंबर द्यावा.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. उपयुक्त माहिती दिली सर..धन्यवाद..🙏

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.