२४ मार्च २०२३ च्या अधिसूचना सुधारणा कायद्यानुसार माध्यमिक शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता कशी लावावी?
M.E.P.S. 1981
सध्या महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेत सेवाज्येष्ठता या विषयावर घमासान सुरू आहे; ते आपल्या अज्ञानामुळे सुरू आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती नियमावली 1981 कोणी कोणी वाचली आहे ? आणि वाचली तर ती किती जणांना समजली आहे? हा मोठा प्रश्न दिसत आहे. कारण वाचतात तर सगळेच पण सर्वांनाच त्याचा अर्थ लावता येतो असे नाही. कारण एक स्वल्प विराम (,) आणि ऑब्लिक (/) या मध्ये सुद्धा कायद्याचा मोठा अर्थ दडलेला आहे आणि क' प्रवर्गातील अर्हता वाचताना आपण त्याकडे लक्ष देत नाही. भराभर वाचतो आणि अर्थ लावतो.
२४ मार्च २०२३ च्या अधिसूचना कायद्याचा अर्थ लावायचा असेल तर यासाठी संपूर्ण सेवाशर्ती नियमावली पुन्हा पुन्हा वाचली तरच त्याचा अर्थ समजेल. नुसती अनुसूची फ नियम क्रमांक १२ वाचून या २४ मार्च २०२३ च्या अधिसूचनेचा अर्थ समजणार नाहीआणि यामुळेच तर आपण अर्धवट ज्ञानाच्या जोरावर चुकीचा अर्थ तर काढत नाहीना ? चुकीचे मार्गदर्शन करीत आहोत का?याचा विचार करावा.
ज्यांना यामधील टीपांचा अर्थ नीट समजला आहे त्यांना काही शंका नाही. पण ज्यांना अर्थ नीट लावता आला नाही त्यांना वाटते यात काही तरी गडबड आहे, संदिग्धता आहे. चुकीचे आहे. माझी पोस्ट पूर्ण वाचा आणि मग ठरवा आपलं चूक की बरोबर.....
सध्या D.Ed विरुद्ध B.Ed असा सेवाज्येष्ठता वाद सुरू आहे. हा वाद ही पोस्ट वाचल्यावर किमान समज, गैरसमज दूर होतील आणि वाद संपुष्टात येतील अशी अपेक्षा करतो.
१) प्रशिक्षित शिक्षक कोणास म्हणावे ?
→ ज्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या पदासाठी लागणारी अर्हता त्याला प्राप्त होते असे विभागाने मान्यता दिलेले व्यवसाय प्रमाणपत्र, पदवी किंवा पदविका मिळविलेला शिक्षक. थोडक्यात Ded आणि Bed या दोनही व्यवसायिक अर्हता आहेत. (Professional qualification ) म्हणजे डी.एड. आणि बी.एड. हे प्रशिक्षित शिक्षक आहेत.
२) प्रशिक्षित पदवीधर कोणास म्हणावे ?
ज्याच्याकडे व्यावसायिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही अर्हता आहेत त्याला प्रशिक्षीत पदवीधर म्हणावे. संदर्भ- १३ ऑक्टोबर २०१६ चा Gr वाचा त्यात प्रशिक्षित पदवीधर कोणास म्हणावे हे स्पष्ट दिले आहे. प्रवर्गात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्रविष्ट होतात. आता ते कसे होतात, यामध्ये मतभिन्नता असण्याचे कारण नाही.
Bed शिक्षक अखंड सेवेतील नियुक्ती दिनांक नुसार क प्रवर्गात प्रविष्ट होतात कारण ते शिक्षक म्हणून नोकरीला लागताना. आधी B.A. / B.Com. / B.Sc ही शैक्षणीक पदवी घेतात आणि त्यानंतर B.Ed ही व्यावसायिक अर्हता धारण करतात.
त्यामुळे नोकरीला लागताना त्यांच्याकडे दोनही अर्हता असल्याने ते नियुक्ती दिनांकास क प्रवर्गात जातात तर....
Ded (दोन वर्षे पाठ्यक्रम) शिक्षकांच्या बाबतीत हीच प्रक्रिया बरोबर उलट आहे. ते आधी व्यावसायिक अर्हता धारण करतात (D.Ed) आणि सेवेत असताना B.A., B.COM,B.SC ही शैक्षणिक अर्हता मिळवतात ज्या दिनांकास या दोन्ही अर्हता त्यांच्याकडे येतात त्या दिनांकास ते क प्रवर्गात समाविष्ट होतात.
तुम्ही कोणत्या वर्गाना शिकवता? कोणती वेतनश्रेणी घेता? वेतनश्रेणी कधी घेतली?
यावरून प्रवर्ग क निश्चित होत नाही हे लक्षात घ्या. वेतनश्रेणी मिळण्यासाठी RTE ACT 2009 नुसार जे शिक्षक संचमान्यतेमध्ये ९ वी १० वी साठी आहेत. तसेच ६ वी ते ८ वी साठी दाखवले आहेत त्यांनाच प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी लागू आहे..
आता ६ वी ते ८ वी ला दाखवलेल्या सर्वच शिक्षकांना ही वेतनश्रेणी मिळत नाही. ३:१ असे प्रमाण आहे.
टीप (१ ड) चे स्पष्टीकरण...
इयत्ता १ ली ते ५ वी या प्राथमिक गटासाठी फक्त D.Ed हीच व्यवसायिक अर्हता असणारे शिक्षक आवश्यक आहेत. या गटातील शिक्षकांनी त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता वाढवली तरी त्यांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी देता येत नसल्याने त्यांची ती अधिकची अर्हता समजण्यात येते. या गटात असणारे पदवीधर Ded शिक्षक देखील प्रशिक्षित पदवीधरच आहेत. ते देखील पदवी प्राप्त दिनांकास के प्रवर्गात जातात. फक्त त्यांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी देता येत नसल्याने अशा शिक्षकांचा प्राथमिक गटात समावेश करण्यात आला आहे. एकाच संस्थेच्या शाळांमध्ये असे प्राथमिक गटात सेवेत असणारे अनेक शिक्षक आहेत. अशा शिक्षकांना संस्थेने ६ वी ते ८ वी किंवा ९ वी ते १० वी या गटात पदवीधर वेतनश्रेणी साठी घेतले असल्यास असे शिक्षक देखील पदवी प्राप्त दिनांकानुसार सेवाज्येष्ठतेसाठी दावा करू शकतात.
ते या गटात केव्हा आले? पदवीधर वेतनश्रेणी केव्हा मिळाली? पदवीधर वेतनश्रेणी मिळालेली नाही. हे मुद्दे कायद्याने गौण आहेत. (महत्वाचे नाहीत.)
R.T.E. कायद्यानुसार फक्त ते माध्यमिक शाळेच्या गटात असणे आवश्यक आहे. (टीप १ ड) चे स्पष्टीकरण यातून मिळाले असेल
यासाठी संदर्भ म्हणून मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे निकाल लक्षात घ्यावेत. आता विषय म्हणजे २४ मार्च २०२३ च्या अधिसूचनेमध्ये महत्वाचा झालेला बदल म्हणजे D.Ed दोन वर्षाचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या शिक्षकास पदवीप्राप्त दिनांकास क प्रवर्गात दाखवण्यात आले आहे.
पान नंबर २ वरील अर्हता पहा...
B.A/B.SC/B.COM, Dip. T (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम), Ded (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम) हा मुख्य बदल होण्यासाठी खालील महत्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे..
१ ऑक्टोबर १९७९ साली Dip. T. हा जुना दोन वर्षाचा पाठ्यक्रम शासनाने बंद करून त्याचेच नाव पुढे D.Ed दोन वर्षाचा पाठ्यक्रम असे करण्यात आले सेवाशर्ती नियमावली मधील अनुसूची फ मधील नियम क्र. १२ मध्ये क प्रवर्गातील अर्हता मध्ये Dip. T. (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम) पदवी दिनांकास दाखविण्यात आला आहे आणि त्याचेच नाव जर D.Ed दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम आहे, मग असे शिक्षक देखील १९८१ सालापासून पदवी प्राप्त दिनांकास क प्रवर्गात आहेत. त्यात सुधारणा होण्यासाठी ४२ वर्षे गेली. आणि आता २४ मार्च २०२३ च्या अधिसूचनेनुसार हा अधिकार त्यांना मिळाला आहे तर सकारात्मक विचार करून आपण सर्वांनी तो स्वीकारायला हवा.
सेवाज्येष्ठते साठी आक्षेप घेणारे पदवीधर D.Ed शिक्षकांमध्ये ९९.९९% शिक्षक हे B.Ed ही शिक्षणशास्त्रातील पदवी धारण केलेले शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना सेवाज्येष्ठता यादीत पदवी प्राप्त दिनांकास क प्रवर्गात प्रविष्ट करून ते सेवाज्येष्ठ ठरत असतील तर त्यांना प्रवर्ग अ मधील मुख्याध्यापक,
प्रवर्ग ब उपमुख्याध्यापक, तसेच क प्रवर्गातील पर्यवेक्षक या पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्यात यावा.
आणखी एक महत्वाचा मुद्दा टीप क्रमांक (१क)
ही टीप D.Ed दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना लागू नाही. कारण प्रवर्ग फ, ह आणि ग मध्ये अप्रशिक्षित शिक्षक येतात. उदा. १० वी, १२ वी तसेच B.A./B.SC./B.COM (पदवीधर ) या अर्हतेनुसार नोकरीला लागलेले सेवेत रुजू झाले तेव्हा शिक्षक होण्यासाठीची व्यावसायिक अर्हता नसणारे म्हणजेच अप्रशिक्षित शिक्षक. त्यामुळे टीप (१क) चा संबंध पदवीधर D.Ed शिक्षकांबरोबर जोडता येणार नाही.
१) D.ed (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम ) शिक्षक पदवी प्राप्त दिनांकास क जातात.
सर्वात महत्वाचे
२) Bed शिक्षक नियुक्ती दिनांकानुसार क प्रवर्गात जातात.
३) क प्रवर्गातील सेवाज्येष्ठ शिक्षक प्रवर्ग अ आणि ब मध्ये जातात. वरील सर्व स्पष्टीकरण सेवाशर्ती नियमावली १९८१ तसेच न्यायालयीन निवाडे यांचा आधार घेऊन केलेले आहे.
२४ मार्च २०२३ ची अधिसूचना हा सेवाशर्ती नियमावलीमधील अनुसूची फ मधील सुधारणा कायदा आहे. हा कोणताही G.R. किंवा शासकीय परिपत्रक नाही. त्यामुळे एखादा कायदा तयार असाच तयार होत नाही. त्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे शासकीय नियमावली याची शासनाच्या न्याय आणि विधी विभागाकडून खात्री केली जाते. अशी खात्री शासनाने करण्यासाठी ८ जून २०२० रोजी अधिसूचना काढून राज्यातील शिक्षकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. माझ्या माहितीनुसार जवळ जवळ ३००० हरकती शासनाकडे आल्या आणि त्यातील योग्य हरकतींचा पुराव्याच्या आधारे विचार करून योग्य तो बदल केला गेला आणि २४ मार्च २०२३ ची अधिसूचना सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. त्या काहीना हा GR वाटला असेल किंवा ही अधिसूचना चुकीची वाटली असेल म्हणून आपण कोर्टात जाऊ आणि यावर स्टे घेऊ, हे आपले विचार चुकीचे ठरतील.
विचार करा. योग्य तो निर्णय घ्या.
@श्री. दीपक आंबवकर
(सेवाशर्ती नियमावली १९८१ चे अभ्यासक )
संपर्क- ९५५२२९५५९५
संदर्भ :
१) सुप्रीम कोर्ट याचिका SLP ७७९९/२०१४
२) सुप्रीम कोर्ट याचिका - ३५१७-३५१८/२०१९
३) मुंबई हायकोर्ट पुनर्विचार याचिका ११५३/२०१९,८६/२०१८ -
४) नागपूर खंडपीठ याचिका क्र. १९६४/२०१६
५) नागपूर खंडपीठ याचिका क्र. ९८३/२०१६
६) औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका- ५१८७/२०१८
७) सुप्रीम कोर्ट रीट याचिका क्र. ११९३४/२०१८
८) मुंबई हायकोर्ट याचिका - १२२१ / २०२२
सुधारित अधिसूचना पुढीलप्रमाणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
10 Comments
एखादा शिक्षक हा नोकरीत लागतांना B,SC.B.ED. असेल आणि D.Ed. च्या वेतनश्रेणीत काम करत असेल तर त्याला सेवाजेष्ठता यादीत केव्हापासुन "क" श्रेणी मध्ये घेता येईल
ReplyDeleteजर प्रायव्हेट अनुदानित शाळेत काम करत असाल तर नोकरीला लागल्यापासून
Deleteसर नमस्कार आमच्या शाळेच्या एक शिक्षिका यांना पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळाली ती त्यांनी नाकारली,नंतर त्यांना मुख्याध्यापक पदाची पदोन्नती मिळाली ती ही त्यांनी नाकारली.मात्र निवड श्रेणी लागू करून घेतली. त्या माझ्या पेक्षा वयाने लहान आहेत. निवड श्रेणी २०% निकषा मुळे मला निवड श्रेणी न मिळता सेवानिवृत्त व्हावे लागेल. मला निवड श्रेणी मिळाली नाही तर कमी पेंशन बसेल.या वर मार्गदर्शन करावे ही विनंती
ReplyDeleteजर त्या सेवेने सेवाजेष्ठ असतील तर काही होऊ शकत नाही..
Deleteसेवा कनिष्ठ असल्यास तुम्हाला दवा करता येईल
सर यातूनही केंद्रप्रमुख बढतीसाठी प्राथमिक(१ ते५) शिक्षकांचा विचार केला जाईल की नाही हे मला कळले नाही
ReplyDeleteNo
Deleteतसेच त्यांची सेवाज्येष्ठता ही ६ ते ८ च्या शिक्षकांच्या समकक्ष समजली जाईल की त्यांच्या कमी समजली जाईल हेही सांगावे सर
ReplyDeleteSamakaksha
Deleteसर माझ्या सेवेचे 24 वर्ष पूर्ण होणार आहेत. माझे बी.एस.सी बीएड असून त्यानंतर मी सेवेत असताना एम .ए (English) केले आहे. शाळेत मी सीनियर आहे. एकूण स्टाफ सध्या 3 शिक्षक व 1मुख्याध्यापक= 4 असा आहे. मी जेव्हा लागले तेव्हा 3 ऐवजी 4 शिक्षक व 1 मुख्याध्यापक =5 असे एकूण पाच शिक्षक पद होते . मला असे सांगण्यात येत आहे की पाच शिक्षक असेल तरच सेवाजेष्ठता त्यापैकी एकाला मिळते तीनच शिक्षक असल्यामुळे शाळेतील कोणत्या च शिक्षकाला सेवाजेष्ठतेचा लाभ मिळत नाही . यासंबंधी नक्की काय नियम आहे ते मला जाणून घ्यायचे आहे . मी बीएससी असल्यामुळे मला एम एस सी च करावी लागेल असे काही आहे का किंवा वायसीएम मधून एम ए एज्युकेशन ही पदवी घेतली तर चालणार आहे का की एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स करावे लागेल असे अनेक प्रश्न मला पडले आहेत .. आणि जर सेवा जेष्ठतेनुसार इन्क्रिमेंट मिळणारच नसेल तर पुढचे पर्याय मला सांगा.योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती.
ReplyDeleteOk
Delete