केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम (सन २०२२-२७) निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

 केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम (सन २०२२-२७) निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यामध्ये संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णय दि.१४.१०.२०२२ अन्वये सन २०२२- २३ ते २०२६ २७ या कालावधीत (६० महिने) "नव भारत साक्षरता कार्यक्रम" योजनेची अमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि.२५.१.२०२३ अन्वये सदर योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. २ अन्वये, मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतखाली दि.१८.०४ २०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र/राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे. संदर्भ क्र.३ मधील शासन निर्णयानुसार मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education policy) २०२० मधील साक्षरता कार्यक्रमासंबंधित टास्कच्या पूर्ततेसाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही प्रभावीपणे करणेबाबत वेळोवेळी सूचित केलेले आहे.


केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेसाठी साक्षरतेकडून समृध्दीकडे (From Literacy to Prosperity) ही Tag Line देण्यात येत आहे. योजनेचा कालावधी एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ असा आहे. राज्यात मागील आर्थिक वर्षात (सन २०२२-२३) राज्याकरीता ६ लक्ष २० हजार एवढे उरिष्ट निर्धारित करण्यात आले होते. विविध कारणामुळे प्रत्यक्षात याबाबतची कार्यवाही व अंमलबजावणी संदर्भ क्र.१ चे शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे मागील वर्षाचे उदिष्ट आणि चालू वर्षातील २०२३-२४ ६ लक्ष २० हजार उद्दिष्ट लक्षात घेता चालू आर्थिक वर्षात एकूण १२ लक्ष ४०


हजार उहिष्टानुसार राज्यात कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


प्रत्येक जिल्हयाचे दोन्ही वर्षांचे उद्दिष्ट राज्यस्तरावरून निश्चित करून देण्यात आलेले आहे. सदरचे उद्दीष्ट सन २०११


जनगणनेतील निरक्षर संख्येनुसार ठरविण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने व २०११


च्या जनगणनेस १२ वर्षांहून अधिक कालावधी उलटला असल्याने सदर योजनेच्या अमलबजावणीसाठी ऑफलाईन पध्दतीने


निरक्षरांचे सर्वेक्षण करणे क्रमप्राप्त आहे. केंद्रशासनाच्या अपमध्ये सर्वेक्षणाची उष्टानुसार ऑनलाईन माहिती भरण्यापूर्वी यासाठी


पुढील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम व मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत


१) सर्वेक्षणाचा उदेश -


अ) निरक्षरांची नावनिहाय, लिंगनिहाय, प्रवर्गनिहाय अदयावत माहिती प्राप्त करून घेणे.


ब) एकूण निरक्षरांची संख्या निश्चित करणे.


क) दरवर्षी साध्य करावयाच्या उदष्टानुसार निरक्षरांचे वर्गीकरण करणे (दरवर्षीच उदष्ट साध्य करण्यासाठी माहिती व संख्या उपलब्ध करणे)


लागणारी


ड) या सर्वेक्षणात निरक्षर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देणे हा


सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. २) ऑफलाईन सर्वेक्षणाचा कालावधी :


निरक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ (१४ दिवस) या कालावधीत पूर्ण करण्यात यावे. या कालावधीतच शाळाबाहय विद्यार्थी शोध मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे. दोन्ही सर्वेक्षण एकाच वेळी करणे सोईचे व्हावे म्हणून हा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण शाळा भरणेपूर्वी व शाळा सुटल्यानंतर करण्यात यावे. शालेय कामकाजाच्या वेळात सर्वेक्षण करू नये.


३) सर्वेक्षण कोणाचे करावे.


वय वर्ष १५ व त्यापुढील सर्व निरक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करावयाचे आहे.

४) प्रपत्र प्रकार व प्रपत्र भरणेबाबत मार्गदर्शक सूचना :-


प्रपत्र क्रमांक १ ते ३ सर्वेक्षकांनी भरावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक ४ ते ६ मुख्याध्यापकांनी तयार करावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक ७ ते ९ केंद्रप्रमुखांनी भरावयाचे आहे. प्रपत्र क्रमांक १० व ११ गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा व अधिव्याख्याता डायट यांनी संयुक्तपणे भरावयाचे आहे. प्रपत्र क्र.१२ व १३ ही प्रपत्रे शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य डायट यांनी संयुक्तपणे भरावे.


निरक्षरांची माहिती भरताना ती इंग्रजी कॅपिटल लेटर्स (capital letters) मध्ये भरावी. व आवश्यक तेथे इंग्रजी अंकाचाच उपयोग करावा. सर्व प्रपत्रांसाठी A-4 आकाराचा कागद वापरावा. १) निरक्षरांची सांख्यिकीय माहिती सर्वेक्षकस्तर प्रपत्र १(सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सर्व करताना भरावयाचे आहे. सर्वेक्षकाने त्यास निश्चित करून दिलेल्या क्षेत्रातील सर्व कुटुंबाची माहिती प्रपत्र १ मध्ये भरणे अनिवार्य आहे.


२) सर्वेक्षकस्तर प्रपत्र २ निरक्षरांची माहिती (सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सके करताना कुटुंबांत निरक्षर व्यक्ती असल्यासच भरावयाचे आहे.


(३) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिगनिहाय सांख्यिकीय माहिती सर्वेक्षकस्तर प्रपत्र ३ (सर्वेक्षकांनी भरावयाचे प्रपत्र ) हे प्रपत्र सर्वेक्षकाने प्रत्यक्ष सब्द संपल्यानंतर तयार करावे.


४) शाळास्तर सांख्यिकीय माहिती प्रपत्र क्र. ४ (मुख्याध्यापकासाठी) हे प्रपत्र तयार करताना मुख्याध्यापकांनी प्रपत्र क्रमांक-१ मधील माहितीचा उपयोग करावा. शाळेने नेमलेल्या सर्व सर्वेक्षकांच्या प्रपत्र-१ मधील सांख्यिकी माहिती सर्वेक्षकनिहाय लिहावी (१५) निरक्षरांची यादी शाळास्तर प्रपत्र क्र.५] (मुख्याध्यापकांसाठी) या पत्रामध्ये शाळेच्या क्षेत्रातील एकूण निरक्षर व्यक्तीची यादी तयार होईल, हे प्रपत्र तयार करताना मुख्यापकांनी प्रपत्र क्र. २ मधील माहितीचा उपयोग करावा.


६) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिगनिहाय सांख्यिकीय माहिती शाळास्तर प्रपत्र ६ (मुख्याध्यापकांनी भरावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष सर्वे संपल्यानंतर तयार करावे, हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र चा उपयोग करावा. (७) निरक्षरांची गावनिहाय सांख्यिकीय संकलित माहिती केंद्रस्तर प्रपत्र क्र.-७ हे प्रपत्र केंद्रप्रमुख यांनी तयार करावयाचे आहे. केंद्रातील प्रत्येक महसूल गावासाठी स्वतंत्र तक्ता तयार करणे आवश्यक राहील. ८) गावनिहाय निरक्षरांची संकलित यादी केंद्रस्तर प्रपत्र क्र.८ (केंद्रप्रमुखांनी तयार करावयाचे प्रपत्र) केंद्रप्रमुख यांनी हे प्रपत्र तयार करताना मुख्याध्यापक यांच्याकडील निरक्षर यादी प्रपत्र क्र.५ चा वापर करावा. प्रत्येक गावातील सर्व निरक्षरांची यादी या नमुन्यात तयार करावी.


९) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिगनिहाय सांख्यिकीय माहिती केंद्रस्तर गावनिहाय प्रपत्र १ (मुखांनी तयार करावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष सर्व संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र.६ चा उपयोग करावा. 

१०) निरक्षरांची सांख्यिकीय माहिती तालुका/ म.न.पा स्तर प्रपत्र क्र. १० (गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व अधिव्याख्याता डायट यांचे करिता) हे प्रपत्र गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, अधिव्याख्याता डायट यानी तयार करावयाचे आहे. गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी, म.न.पा व अधिव्याख्याता डायट यांनी गावनिहाय/वार्डनिहाय निरक्षराचा साख्यिकीय माहिती प्रपत्र क्र. ७ केंद्रप्रमुखाकडून प्राप्त करून एकत्रीकरण करावे सदरहू माहिती शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाला सादर करावी. ११) निरक्षरांची प्रवर्गनिहाय लिगनिहाय सांख्यिकीय माहिती तालुकास्तर गावनिहाय प्रपत्र क्र. ११- (गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, अधिव्याख्याता डायट यांचे करिता) हे प्रपन्न गट - शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व अधिव्याख्याता डायट प्रत्यक्ष संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. ९ चा उपयोग करावा.


(१२) निरक्षरांची सख्यकीय माहिती जिल्हास्तर प्रपत्र क्र.१२ (शिक्षणाधिकारी योजना व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व


प्रशिक्षण संस्था यांच्या करिता) शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी


तालुक्यातील निरक्षरांची सांख्यिकीय माहीती गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा यांच्या कडून प्रपत्र क्र. १० प्राप्त नुसार एकत्रिकरण करून तयार करावी. १३) निरक्षरांची प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय सांख्यिकीय माहिती जिल्हास्तर तालुकानिहाय प्रपत्र क्र.१३-


(शिक्षणाधिकारी योजना व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यानी तयार करावयाचे प्रपत्र) हे प्रपत्र शिक्षणाधिकारी (योजना) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यानी प्रत्यक्ष सह संपल्यानंतर तयार करावे. हे प्रपत्र तयार करण्यासाठी प्रपत्र क्र. ११ चा उपयोग करावा.


५) सर्वेक्षण कोठे करावे.


या सर्वेक्षणात दिनांक १७०८२०२२३१.०८.२०२३ या कालावधीमध्ये निरक्षर व्यक्तींचा शोध घेताना ग्रामपंचायत /नपा/मनपा क्षेत्रात प्रत्येक कुटुंबात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेणे क्रमप्राप्त आहे. सदरचे सर्वेक्षण ती बाड़ी गाव सर्व खेडी, तांडे, पांडे, शेतमळा बार्ड या सर्व ठिकाणांचा समावेश करण्यात यावा. एकही निरक्षर व्यक्ती सर्वेक्षणातून वगळली जाणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रत्येक टप्यावरील प्रशासनाकडून घेण्यात यावी.


६) सर्वेक्षणाची कार्यपद्धती १) नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत शाळा हे एकक (यूनिट) आहे. त्यामुळे ऑफलाइन सर्वेक्षणासाठी शाळांनी


क्षेत्र निश्चित करून सर्वक्षक-शिक्षक यांची नियुक्ती करावी म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक (सदस्य सचिव) व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे संयुक्त स्वाक्षरीने सर्वेक्षण करणेबाबत सर्वेक्षक शिक्षक याना लेखी स्वरूपाचे आदेश देण्यात यावेत.


२) यापूर्वी शाळास्तरावर शाळानिहाय कुटुंब सर्वेक्षण, गावपंजिका, शाळाबाहय विदयार्थी शोधमोहिम राबविण्यात आलेली आहे. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा यांचे प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात आलेले आहे.


पंचायत समिती स्तरावर गटसाधन केंद्रात कार्यरत असलेले विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांचेही सहकार्य घेण्यात


आलेले आहे.


३) सर्व माध्यमांचे व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक यांना सूचीत करण्यात येते की, शाळानिहाय कुटुंब सर्वेक्षण, गावपंजिका, शाळाबाहय विद्यार्थी शोध मोहिम करताना ज्या शिक्षकांची मदत घेण्यात आली होती. अशा शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षण मोहिमेसाठी सर्वेक्षक शिक्षक म्हणून आदेशित करण्यात यावे. पूर्वीचे सर्वेक्षण करतांना निर्धारित केलेले क्षेत्र अशा सर्वेक्षक शिक्षकांना निश्चित करून द्यावे. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्वेक्षक शिक्षक यांनी सर्वेक्षण केल्यानंतर प्राप्त माहिती विहित प्रपत्र मध्ये भरून मुख्याध्यापक यांना सादर करावे. ४) प्रथमतः शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यामिक / योजना) यांनी संयुक्त स्वाक्षरीने निरक्षर शोध सर्वेक्षण मोहिम बाबत जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी, नगरपालिका पाना पत्राद्वारे कळवावे.


१५) शिक्षणाधिकारी (योजना) व यांनी गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांच्याकडून गाव केंद्र व शाळास्तरानुसार नियोजन तयार करण्याच्या सूचना देवून अंमलबजावणी करावी.


६) प्रमुख यानी शाळानिहाय आवश्यक सर्वेक्षक शिक्षक संख्या निर्धारित करुन यादवा तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. (७) केंद्रशाळेवर केंद्रप्रमुखांनी सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक यांना विविध प्रपत्रात माहिती भरणेबाबत प्रशिक्षण दयावे. मुख्याध्यापक यांनी शाळास्तरावर सर्वेक्षणासाठी आदेश प्राप्त सर्वेक्षक शिक्षक याना विहित नमून्याचे प्रपत्र भरणे बाबत माहिती देण्यात यावी. पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणाबाबत माहितीचे संकलन विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांच्या मदतीने करून तालुकास्तरावरील माहिती शिक्षणाधिकारी (योजना) यांना पाठवावी. (८) क्षेत्रिय सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यामिक/ योजना) गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचेवर निर्धारित करण्यात आलेली असून आपल्या अधिनस्त कर्मचा- यांकडून दिलेल्या तारखेप्रमाणे प्रत्यक्षात सर्वेक्षणांची सुरूवात करून अहवाल विहित प्रपत्रात सादर करणे आवश्यक राहिल. (९) या सर्वेक्षणातून विविध स्तरावर प्राप्त होणारी साख्यिकीय माहिती, निर्धारित करुन दिलेल्या विहित प्रपत्रात प्राप्त करून घेऊन शिक्षणाधिकारी (योजना) यांनी शिक्षण संचालनालय योजना यांना सादर करावी. सर्वेक्षणाच्या माहितीचा ऑनलाईन गुगल लिक तयार करण्यात येत असून त्यामध्ये वेळोवेळी माहिती भरणे अनिवार्य राहील.


७) सर्वेक्षण करणेबाबत कार्यवाही सर्व जिल्हास्तर, तालुकास्तर, केंद्रस्तर शाळास्तर अधिकाऱ्यांनी आपआपल्या स्तरावर सर्वेक्षण करणेबाबत सर्व बैठकीचे आयोजन करून सविस्तर मार्गदर्शन करावे, बैठकांचे आयोजन प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरु करणेपूर्वी करण्यात यावी.



मुख्याध्यापक


१) ऑगस्ट महिन्याच्या दुसन्या आठवडयात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे,


२) निरक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी शाळेतील सर्वेक्षक शिक्षक यांना निश्चित करून दिलेल्या ठिकाणी नेमणेबाबत नियोजन करणे.


३) सर्वेक्षक शिक्षक यांना सर्वेक्षण करण्याबाबतचे लेखी आदेश देणे. (४) सर्वेक्षक करताना भरावयाची प्रपत्रे यांची माहिती समजावून सांगणे

५) सर्वेक्षक शिक्षक यांना सर्वेक्षण करण्यासाठी यावयाच्या आवश्यक प्रपत्रांच्या प्रती उपलब्ध करून देणे. (Xerox) ६) सर्वेक्षक शिक्षक यांनी भरलेली सर्वेक्षण प्रपत्रे शालेय स्तरावर जतन करावयाची आहे. पुढील काळात हीच माहिती भरलेली प्रपत्रे आवश्यकतेनुसार वापरली जाणार आहे


(७) निरक्षरांची माहिती भरताना ती इंग्रजी कैपिटल लेटर्स (capital letters) मध्ये भरावी व आवश्यक तेथे इंग्रजी अंकाचाच उपयोग करावा. सर्व प्रपत्रासाठी A-4 आकाराचा कागद वापरावा, ८) सर्वेक्षक शिक्षकांमार्फत विहित कालावधीत (दि. १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३) सर्वेक्षण पूर्ण करणे.


केंद्रप्रमुख 

१) आपल्या केंद्रातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांतील मुख्याध्यापकांची केंद्रशाळेत बैठक आयोजित करणे. २) केंद्रातील सर्व मुख्याध्यापकाना शाळास्तर प्रपत्रे भरण्याबाबत प्रशिक्षण देणे.


गट शिक्षणाधिकारी


 १) तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक आयोजित करणे.

२) अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी बैठकीत सर्व केंद्रप्रमुखांना निरक्षर सर्वेक्षण करणेबाबतची प्रपत्रात माहिती कशी करावी है समाजावून सांगणे,

३) शाळा स्तरावरून प्राप्त प्रपत्रातील माहितीचे विहित नमुन्यात एकत्रित संकलन करणेबाबत गट साधन केंद्रातील विषय तज्ञ, विशेष शिक्षक यांना केंद्रानिहाय वाटप करावे. 

४) सर्व सांख्यिकी माहिती बिनचूक पने भरण्याची जबाबदारी गट साधन केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर व शालेय पोषण विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना देणे.


शिक्षणाधिकारी

(योजना) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


(१) जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित करणे.


२) बैठकीसाठी प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता यांनी सर्वेक्षण करण्यासाठीचे सर्व प्रपत्रे समजावून सांगणे,


३) सर्वेक्षण करणेबाबतचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे. ४) तालुकास्तरीय सर्वेक्षण सांख्यिकीय माहिती प्राप्त झाल्यानंतर जलद गतीने राज्य स्तरावरून प्राप्त ऑनलाईन गुगल लिंक मध्ये भरण्याबाबत नियोजन व जबाबदारी देण्यात यावी.


९) सर्वेक्षणांबाबत जनप्रबोधन


१) केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमांची माहिती प्रत्येक शाळा, महाविद्यालय, वाचनालये, बचतगट यांच्यापर्यंत पोहोचवणे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती यांचा गावपातळीवरील निरक्षर व्यक्ती शोध मोहीम आणि गृह भेटी घेणेबाबत प्रेरित करणे.


२) स्थानिक दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे तसेच Whatsapp, Facebook, Instagram इत्यादी व्दारे व्यापक प्रमाणात उद्बोधन करणे, विविध संस्था, संघटना व स्वयंसेवी संस्था यांना याबाबतचा जनप्रसार व्यापक प्रमाणात करणेबाबत आवाहन करण्यात यावे.


३) पंचायत समिती सभापतीसह पंचायत समिती सदस्यांना आपआपल्या कार्यक्षेत्रातील गावामधून या सर्वेक्षणासाठी सहकार्य व सहभागी होण्याचे आवाहन करावे.


४) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापतीसह सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांना आपआपल्या कार्यक्षेत्रातील सहभागासाठी विनंती करावी. (५) दिनांक १५/०८/२०२३, स्वातंत्र्य दिन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात सर्व योजनांची थोडक्यात माहिती देणे व शाळास्तरावर होणाऱ्या प्रभात फेरीमध्ये नव भारत साक्षरता कार्यक्रमांचा प्रचार करण्यात यावा. उपरोक्त प्रमाणे निरक्षर शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करावी.


सोबत १. परिशिष्ट जिल्हास्तर ते शाळास्तर समित्या -


२. प्रपत्र ९ ते १३ सर्वेक्षकस्तर ते जिल्हास्तर माहिती (हार्ड व सॉफ्ट कॉपी) ३. नमुना प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी व प्राचार्य यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे


(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे








वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.