Shalarth Pay bills August 2023 Update - माहे ऑगस्ट 2023 चे वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत.

 ऑगस्ट 2023 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.


1) ज्या कर्मच्यान्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे ऑगस्ट 2023 चे वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.


2) जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये.


(3) DA अरिअर्स या टॅब मधील रक्कम ) करण्यात यावी.


4) आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे वेतन हे LPC नुसार अदा करावे अशी सूचना मागील महिन्यात देऊनही काही तालुक्यातील शिक्षकांचे माहे मे व जून चे वेतन काढण्यात आले नाही ही गंभीर बाब आहे. ज्यांनी अद्यापही मागील वेतन शालार्थ मध्ये काढण्यात आले नाही त्यांना माहे ऑगस्ट मध्ये काढण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे. यानंतर मात्र पुनश्च ब्रोकन पिरेड उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.


(5) Income Tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2022-23 मध्ये कर्मचान्यास पडलेला एकूण आयकर (TDS बजा जाता) / 10 वाला 100 च्या पटीत) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचान्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये बेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी,


6) देयक Forward केल्यानंतर एकाही शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करू नये याबाबत अधिनस्त सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे. वारंवार सुचना देऊनसुद्धा शिक्षक आपले शाखा बदल करत आहेत व त्यामुळे वेतन जमा होण्यास अडचणी होत आहेत. 7) शालार्थ प्रणालीमध्ये झालेल्या नवीन बदलानुसार यानंतर BASIC 7PCDA HIRA.TA NPS ALLOW या व्यतीरीक्त सर्व Tab या बंद करण्यात आलेल्या आहेत.


8) Paybill Generate केल्यानंतर DDO (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. 9) सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे.


10) प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून (Excel file) तपासणी करण्यात यावी. (11) DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके तपासणी करून योग्य असल्याबाबत खात्री करूनच दिनांक 19 ऑगस्ट 2023 ला सकाळी 11.00 वाजेपर्यंत DDO 3 ( शिक्षणाधिकारी ) यांचे लॉगोन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी. 12) प्राथमिक शिक्षक 22020173(36) या लेखाशीर्ष चे शालार्थ प्रणाली अंतर्गत डीटेल्स अबस्ट्रेक रिपोर्ट नुसार GPF Shedule गटशिक्षणाधिकारी यांचे पस्वाक्षरीसह सादर कराव्या. दि. 22 ऑगस्ट 2023 ला सकाळी 11 वाजेपर्यंत शिक्षण विभाग (प्राथमिक) बजेट शाखा यवतमाळ सादर करण्यात यावे.
वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadमहत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.