बदली अपडेट - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत दाखल न्यायालयीन याचिकांवर करावयाच्या कार्यवाही बाबत ग्रामविकास विभागाचे आजचे निर्देश.

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रीयेत दाखल झालेल्या रिट याचिकांमध्ये मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन न केल्याचे निदर्शनास आले आहे.


२. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागाने संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णय दि.२१/०६/२०२३ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागास निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित धोरण अद्याप निर्गमित करण्यात आलेले नाही. यास्तव, सन २०२३-२४ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करता आलेली नाही.


३. तथापि, मा. न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेतील विविध रिट याचिकांप्रकरणी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ तसेच प्रचलित धोरणानुसार ऑफलाईन पध्दतीने समुपदेशन करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करावे. कोणत्याही परिस्थितीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.


(पो.द. देशमुख)


प्रतः कार्यासन आस्था-१४ संग्रहार्थ.


उप सचिव, महाराष्ट्र शासन





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.