Ycmou Admission 2023 Update - आता एकाच वेळी दोन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये.

 Double Degree For Students: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; ड्युअल डिग्रीचा पर्याय उपलब्ध.. 


आता पारंपारिक विद्यापीठाच्या पदवी सोबतच मुक्त विद्यापीठाची पदवीही मिळवणे सहज शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर, तुम्ही शिकत असलेल्या एखाद्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाबरोबर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी(Degree), पदविका (Diploma) किंवा प्रमाणपत्र स्तरावरील (Certificate Courses) करता येणार आहेत.


यासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असून. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये दूरस्थ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इथल्या विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत येणार आहेत.


इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश अर्ज भरण्यासाठी :

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी.

त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.

आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.

सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.

व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.

सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.

(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)

महत्त्वाचे :

राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत

अंध विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ

राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू.१९०/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपल्या जवळच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक.

https://ycmouoa.digitaluniversity.ac/


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कोणकोणते डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.