दिनांक 10 जुलै 2023 पासून सुरू होणारे वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण आपल्या मोबाईलवर कसे पूर्ण करावे सविस्तर माहिती

 दिनांक 10 जुलै 2023 पासून वरिष्ठ वेतन श्री व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे सदर प्रशिक्षण आपण आपल्या मोबाईल वरून देखील पूर्ण करू शकता किंवा जर आपल्याकडे लॅपटॉप किंवा पीसी असेल तर त्यावर देखील पूर्ण करू शकता.

 आपण बहुतांश शिक्षक अँड्रॉइड मोबाईल वापरत असल्यामुळे व तो सहज उपलब्ध असल्यामुळे आपल्या मोबाईल वरून देखील वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करू शकता  कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पूर्ण करावे याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.


खालील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करा त्यानंतर प्ले स्टोअर च्या सर्च बॉक्समध्ये Infosys springboard टाकून सर्च करा स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे आयकॉन असलेले एप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईल ॲप लिस्ट मध्ये दिसेल त्यानंतर ॲप ओपन करा.


वरील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे आलेल्या विंडोवर अलाऊ बटनवर तीन वेळा क्लिक करा.
ॲप ओपन केल्यानंतर Accept All Cookies बटन ला क्लिक करा त्यानंतर पहिल्या स्क्रीन शॉट मध्ये दिलेल्या लाल रंगांच्या गोल मध्ये असलेल्या बटन वर क्लिक करा.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून मिळालेल्या आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक करा. लॉगिन आयडी पासवर्ड मिळाला नसेल तर तो प्रशिक्षण सुरू होण्याअगोदर आपल्या मोबाईल नंबर वर व ईमेल आयडी वर प्राप्त होईल.
लॉगिन यशस्वी झाल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूच्या वरील गोल वर क्लिक करून तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायची आहे.


प्रोफाईल एडिट ला क्लिक करून प्रोफाइल अपडेट करून त्यामध्ये फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुमचे मराठीत पूर्ण नाव टाका लास्ट नेमच्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक असणार आहे यामध्ये कोणताही बदल करू नका. त्यानंतर तुमच्या आवडी निवडी सिलेक्ट करा व सेव करा.
मोबाईलच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.


मोबाईल ॲपच्या सर्च बॉक्समध्ये प्रशिक्षण किंवा एस सी इ आर टी हा शब्द टाईप करून सर्च करा.
तुम्ही नाव नोंदणी केलेला योग्य कोर्स इथे दिसेल किंवा सर्वात शेवटी समाविष्ट असलेल्या चॅनलला क्लिक करा व तुमचा कोर्स निवडा.
प्रस्तुत चैनल वर तुम्ही नाव नोंदणी केलेला कोर्स दिसेल.


तुम्ही निवडलेला कोर्स डाव्या बाजूला कौल करून तुमचा कोर्स निवडायचा आहे तुम्ही ज्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे तो कोर्स निवडायचा आहे इतर कोर्स ओपन होणार नाही.
कोर्स निवडल्यानंतर स्टार्ट बटन वर क्लिक करून प्रशिक्षणाला सुरुवात करावी.
सुरुवातीला त्या घटकाची पीडीएफ दिसेल पीडीएफ चा अभ्यास झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी उजव्या बाजूच्या निळ्या बटनाला क्लिक करा.

खालील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला सर्व घटकांत किंवा मॉडेलमध्ये सुरुवातीला पीडीएफ व नंतर व्हिडिओ दिसतील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ हीच केल्यास शेवटी प्रमाणपत्र मिळणार नाही प्रत्येक व्हिडिओ पाहिल्याचा वेळ आपल्या डॅशबोर्ड वर नोंद होत आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहावा लागणार आहे


वरील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक घटकाचे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर शेवटी स्वाध्याय असेल स्वाध्याय मधील प्रश्न टेक्स्ट स्वरूपात टाईप करून पाठवू शकता किंवा कागदावर लिहून पीडीएफ फाईल अपलोड करू शकता किंवा व्हिडिओ तयार करून देखील आपण अपलोड करू शकता.


स्वाध्याय सोडवण्यासाठी एकूण दोन तास वेळ असेल दोन तास पूर्ण झाल्यानंतर कुठलेही प्रकारे अतिरिक्त वेळ वाढवून मिळणार नाही ज्यावेळेस स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी आपला व्हिडिओ किंवा पीडीएफ किंवा टेक्स्ट सॉफ्ट कॉपी तयार असेल त्यावेळेस स्टार्ट बटन वर क्लिक करावे.


वरील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे त्यानंतर याच प्रकारे सर्व घटकातील पीडीएफ व्हिडिओ व स्वाध्याय क्रमाने सोडवत जायचे आहे सोडवलेल्या घटकाला हिरव्या रंगाची डबल टिकमार्क दिसून येईल.

खालील स्क्रीन शॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक घटक सोडवून पूर्ण झाल्यानंतर शेवटी चाचण्या सोडवणे बंधनकारक असेल.
ज्यावेळी आपणास चाचणी सोडवण्याची तयारी पूर्ण झाली असेल त्यावेळी स्टार्ट बटन दाबावे तयारी नसल्यास स्टार्ट बटन दाबू नये. चाचणी सोडवण्याची संधी फक्त एकदाच आहे चाचणीची वेळ तीन तास असेल स्टार्ट बटन ला क्लिक केल्यावर चाचणीची वेळ सुरू होईल.


वरील स्क्रीन शॉट मध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक घटकांमध्ये पाच प्रश्न आहेत अटेम्प्ट सिलेक्शन ला क्लिक करून प्रश्नांची उत्तरे अचूक निवडून सेव करा त्याप्रमाणे सर्व घटक पूर्ण करा.
संपूर्ण घटकांमधील प्रश्न सोडून झाल्यानंतर सर्वात शेवटी फिनिश टेस्ट या लाल रंगाच्या मोबाईल मधील उजव्या बाजूला वरील बटनवर क्लिक करा.

संपूर्ण घटक किंवा मॉडेल व चाचण्या सोडवून पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला या प्रशिक्षणाबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे अभिप्राय नोंदवल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होईल.सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थी बांधवांना प्रशिक्षणास साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


प्रशिक्षण सुरू असताना देखील आपल्याला वेळोवेळी आलेल्या अडचणी सोडवण्याबाबत मार्गदर्शन मिळेल.


वरील माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणा बाबत  नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या व फॉलो करा.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.