राज्यातील सर्व शाळांमध्ये संरक्षक भिंतीचे काम आता होणार मनरेगा अंतर्गत शासन आदेश

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये संरक्षक भिंतीची कामे घेणेबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)

दिनांक २५ जुलै २०२३.


प्रस्तावना: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही योजना राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाहु महाराष्ट्र या नावाने मनरेगा योजनेच्या निकषांप्रमाणे राबविण्यात येत आहे. मनरेगा योजनेतर्गत शाळेसाठी कंपाऊड हे काम अनुज्ञेय असल्याने सदर काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत देखील अनुज्ञेय आहे. नियोजन (रोहयो प्रभाग) विभागाच्या संदर्भाधीन दिनांक ०१/१२/२०२० रोजीच्या शासन परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाडयांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन परिपत्रकान्वये जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या यांच्या भौतिक विकासाकरीता पुढील १३ कामे मनरेगांतर्गत घेण्याबाबत निदेश देण्यात आले आहेत.


१) शाळेसाठी किचन शेड, २) शाळा/ अंगणवाडीच्या इमारतीसाठी रेन वॉटर हारवेस्टींग संरचना,


३) शाळा / अंगणवाडीच्या परिसरात शोषखड्डा.


४) शाळा / अंगणवाडीच्या परिसरात Multi Unit शौचालय. 4) शाळा/ अंगणवाडीसाठी खेळाचे मैदान.


६) शाळा / अंगणवाडीसाठी संरक्षक भिंत (Wall Compound).


(७) वृक्षलागवड (बिहार पॅटर्न)


८) आवश्यकतेनुसार शाळा / अंगणवाडीसाठीच्या परिसरात पेव्हींग ब्लॉक, ९) शाळा / अंगणवाडीच्या परिसरात बाहेर काँक्रीट नाली बांधकाम.


१०) शाळा /अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापुर्ण करणे. (१५) बोअरवेल पुनर्भरण (शाळा /अंगणवाडीत बोअरवेल असल्यास)


१२) गांडुळ खत प्रकल्प (यामध्ये तयार होणारे गांडुळ खत शाळा/ अंगणवाडीच्या परिसरातील झाडासाठी वापरता येईल) (१३) नाडेप कंपोस्ट.


राज्यातील सर्व शाळांभोवती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेमधुन शाळांच्या संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यासाठी सुचना निर्गमित करण्यात याव्यात असे निदेश दिनांक १३/०६/२०२३ झालेल्या मा. राज्य मंत्रिमंडळाच्या बतकीत देण्यात आले आहेत. त्यानुसार मनरेगा योजनेंतर्गत राज्यातील सर्व शाळाभोवती संरक्षक भिंतीची कामे (Compound Walls) घेण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना निर्गमित करण्याचे शासनाचे विचाराधीन होते.

शासन निर्णय उपरोक्त बाचा" येथील दिनांक ०१ डिसेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकात अन्य कामांसोबत अनु.क्र.६) वर शाळा /अंगणवाडीसाठी संरक्षक भिंत (Wall Compound) या कामाचा यापुर्वीच समावेश करण्यात आला आहे. तथापि, सदर सुचना या केवळ जिल्हा परिषद शाळा /अंगणवाडी यांसाठीच देण्यात आल्या आहे. मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १३/०६/२०२३ रोजीच्या बैठकीत मनरेगांतर्गत सर्व शाळाभोवती संरक्षक भिंती बांधण्याचे निदेश असल्याने यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शाळा, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शाळा, आदीवासी विकास विभागाच्या शाळा, अल्पसंख्याक विकास विभागाच्या शाळा आणि सदर विभागांच्या अनुदानित/ विनाअनुदानित शाळाचा देखील समावेश करण्यात येत आहे. तथापि, सदर शाळांच्या संरक्षक भिंतीचे काम करतांना जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडया यांच्या कामांना प्राधान्य देऊन तद्नंतर इतर शासकीय शाळा, शासनअनुदानित शाळा आणि विनाअनुदानित शाळा अशा क्रमाने शाळांसाठी संरक्षक मितीचे काम मनरेगांतर्गत घेण्यात येईल. १२. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामावरील मजुरी (अकुशल) आणि साहित्य (कुशल) यावरील खर्चाचे प्रमाण जिल्हास्तरावर अनुक्रमे ६०:४० असे राखावयाचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने अधिसुचनेन्वये निदेश दिले आहेत. संरक्षक भिंतीच्या कामांवरील खर्च हा प्रामुख्याने साहित्यप्रधान खर्च असल्यामुळे सदर कामे मनरेगांतर्गत पुर्ण करतांना मर्यादा येतात. तथापि, मनरेगांतर्गत शाळांभोवती संरक्षक मिर्तीची कामे करताना मनरेगांतर्गतील अकुशल व कुशल खर्चावरील अनुक्रमे ६०४० असे प्रमाण राखण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. 

१) ज्या शाळा/ अंगणवाड्यांमधील परिसरात मनरेगांतर्गत मजुरीप्रधान कामे करणे शक्य आहे.


अशा ठिकाणी मनरेगातर्गत शाळेसाठी संरक्षक भिंत आणि अन्य मजुरीप्रधान अनुज्ञेय कामे जसे वृक्षलागवड, मैदानाचे सपाटीकरण वा अन्य) घेऊन अकुशल च कुशल खर्चावरील अनुक्रमे ६०:४० असे एकुण प्रमाण राखण्यात यावे. या प्रकारे अकुशल व कुशल खर्चावरील प्रमाण राखुन कार्यवाही करतांना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे मनरेगांतर्गत संरक्षक मितीचे काम करतांना शाळांचे प्राधान्यक्रम पाळण्याची आवश्यकता नाही.


२) वरीलप्रमाणे ज्या शाळा/ अंगणवाडयांच्या परिसरात मनरेगांतर्गत मजुरीप्रधान कामे करणे शक्य नाही, अशा ठिकाणी शाळेतील पात्र विद्यार्थी/ कर्मचारी यांचे शेतावर / पडीक जमीनीवर मनरेगांतर्गत फळबाग लागवड/ वृक्षलागवड वा तत्सम अन्य मजुरीप्रधान (अकुशल) कामे घेऊन मनरेगांतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी अकुशल व कुशल खर्चावरील अनुक्रमे ६०:४० असे प्रमाण राखण्यात यावे. या प्रकारे अकुशल व कुशल खर्चावरील प्रमाण राखुन कार्यवाही करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे मनरेगांतर्गत संरक्षक भिंतीचे काम करतांना शाळांचे प्रधान्यक्रम पाळण्याची आवश्यकता नाही.


३) ग्रामपंचायत पातळीवर मनरेगांतर्गत अनुज्ञेय विविध कामे आणि शाळेसाठी संरक्षक भिंतीचे काम यांच्या संयोजनातुन देखील शाळांसाठी संरक्षक भिंतीचे काम करता येईल. 

४) ग्रामपंचायतीमध्ये मनरेगांतर्गतच्या कामावरील प्रत्यक्ष खर्चानुसार उपलब्ध अतिरिक्त कुशल: घटक या संभाव्य अतिरिक्त कुशल घटक यांच्या मर्यादेत शाळेसाठी संरक्षक मितीचे काम करता येईल. 

५) ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध विविध निधी जसे, वित्त आयोगाचा निधी, पेसांतर्गत उपलब्ध निधी, आमदार/खासदार यांचा विकास निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी. ग्रामपंचायतीचा स्वनिधी, सीएसआर व ज्या योजनेंतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंत हे काम अनुज्ञेय अशा सर्व केंद्रीय / राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय योजना यांच्या अभिसरणातून पुरक कुशल खर्च (Part-C) उपलब्ध करुन देखील शाळेसाठी संरक्षक भिंत हे काम मनरेगांतर्गत करता येईल. शाळेसाठी संरक्षक भिंत या कामांचा अकुशल घटकावरील खर्च (Part-A) आणि सदर खर्चाच्या प्रमाणात उपलब्ध कुशल घटकावरील खर्च (Part-B) मनरेगांतर्गत प्राप्त होईल.


३. जळगाव जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंत या कामाचे अभिसरणातुन मोठ्या प्रमाणावर कामे घेण्यात आली आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील मनरेगा योजनेंतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंत या कामाचे अंदाजपत्रक विचारात घेऊन नरेगा आयुक्त, नागपुर यांच्या कार्यालयामार्फत १०० मिटर इतक्या लांबीच्या कामाचे नमुना अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदर नमुना अंदाजपत्रक आणि कामाचे डिझाईन परिशिष्ट "अ" म्हणुन सोबत जोडले आहे. मनरेगा योजनेसोबत अभिसरण, विविध कामांच्या संयोजनाव्दारे तसेच पुर्णपणे मनरेगांतर्गत अशा माध्यमातुन शाळेसाठी संरक्षक भिंतीच्या कामांचे वेगवेगळे डिझाईन तयार करुन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल असे नमूना अंदाजपत्रक नरेगा आयुक्त, नागपुर या कार्यालयामार्फत तयार करुन शासनस्तरावर, क्षेत्रीय कार्यालयांना आणि Mahaegs संकेतस्थळावर तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.


४. शासन आदेशान्वये वेळोवेळी विहीत केलेल्या आदेशानुसार मनरेगांतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंतीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे आणि प्रशासकीय मान्यता देणे याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर करण्यात येईल.


५. मनरेगांतर्गत शाळेसाठी संरक्षक भिंतीचे काम करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्ताव संबंधीत ग्रामपंचायतीकडे सादर करण्याची कार्यवाही संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत करण्यात येईल. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सदर प्रस्तावानुसारच्या कामांचा मनरेगा योजनेच्या वार्षीक पुरवणी कृती आराखड्यामध्ये तातडीने समावेश करुन घेण्याची कार्यवाही करावी. सदर कामे त्याच आर्थिक वर्षात सुरु होतील, याकरीता संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे संबंधित मुख्याध्यापक / ग्रामसेवक / ग्रामरोजगार सेवक संयुक्तपणे पाठपुरावा करतील. तसेच, उपरोक्त प्रमाणे ग्रामपंचायतींमार्फत प्राप्त शाळेसाठी संरक्षक भिंतीच्या कामांच्या प्रस्तावांकरीता तातडीने तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही संबधित कार्यक्रम अधिकारी आणि संबधित तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.


६. मा. राज्य मंत्रिमंडळाच्या निदेशानुसार सदर शासननिर्णय निर्गमित करण्यात येत असल्याने विविध विभागांच्या सर्व संबंधित शासकीय अधिकारी/ कर्मचारी आणि नरेगा कक्षातील कर्मचारी यांनी सदर शासननिर्णयानुसार प्राथम्याने कार्यवाही करावयाची आहे.


७. सदर शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन त्याचा संगणक संकेतांक २०२३०७२६१६०६५२८३१६ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


SANJANA PRADEEP KHOPDE


(संजना खोपडे )


उप सचिव, महाराष्ट्र शासन.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.