मुदतवाढ! मुदतवाढ! ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ! परिषदेच्या संचालकांचे आदेश

ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेच्या मुदतवाढीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराज संचालकांनी दिनांक 12 जून 2023 रोजी मुदतवाढ देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


ऑनलाईन वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार मागील शैक्षणिक वर्षामध्ये दिनांक १ जुन २०२२ रोजी राज्यातील ९४.५४२ शिक्षकांसाठी • ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष सन २०२३- २०२४ मध्ये संदर्भ क्रमांक २ अन्वयेच्या पत्रानुसार दिनांक २९ मे २०२३ ते १२ जून २०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये नावनोंदणी करणेसाठी मुदत देण्यात आली होती.


तथापि संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांचेमार्फत प्रशिक्षण नावनोंदणी साठी मुदतवाढ देणेबाबतची निवेदने या कार्यालयास सादर केलेली आहेत. सदरच्या सर्व प्राप्त निवेदनांचा विचार करता प्रशिक्षण नावनोंदणीसाठी सद्यस्थितीमध्ये दिनांक १३ जून २०२३ ते २० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.


तरी उपरोक्तप्रमाणे प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेच्या मुदतवाढीबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रामधील चारही गटातील शिक्षक संवर्गामधील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र उर्वरित शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे.


(शरद गोसावी)


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.वरील परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 नोंदणीसाठी लिंक.. 

http://training.scertmaha.ac.in/index.aspx


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.