सोमवार दिनांक 26 जून 2023 पासून करता येणार महसूल विभागातील एकूण 4644 तलाठी पदांसाठी अर्ज महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन तलाठी पदभरती 2023 जाहिरात

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तलाठी पद भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळ सेवा भरती करिता महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.


 परिक्षा दिनांक :- याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. 

३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणान्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. 


३.२ जाहिरातीची माहिती  या https://mahabhumi.gov.inलिंकवर उपलब्ध आहे.


पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-


४.१ पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी / वाढ होण्याची शक्यता आहे. ४.२ पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळावेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.


संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परिक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. ४.३ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिद झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल ऑतम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणान्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल कमी होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पदसंख्या / अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त पदे परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल, यास्तव परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्यावर विचारात घेतली जाणार नाही.


४.४ महिलासाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाच्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावं. तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र.महा २०२३/प्र.क्र.१२३/कार्या- २ दि.४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षीत असलेल्या पदावरती निवडीकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणेत आलेली आहे. तसेच, अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणान्या महिलांना त्या पा मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ४.५ विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असललो पद आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल,


४.६ एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र Caste Certificate) उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.


४.७ समातर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-२०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ दि. १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२११८/प्र.क्र. ३९/१६-अ, दि. १९ डिसेंबर २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.


४.८ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र राआधी ४०१९/प्र.क्र.२१/१६- दि.१२ फेब्रुवारी, २०१९ व दि.३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

 २४.९ शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१२/प्र.क्र. १८२/विना-१, दि. २५ मार्च, २०१३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार तसेच शासन शुध्दीपत्रक संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल. 

४.१० शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१३/प्र.क्र. १८२/विनाभन-१, दि. १७ ऑगस्ट, २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट यामध्ये मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. 

४. ११ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा तपशील कालावधी विचारात घेण्यात येईल. 

४.१२ अराखीव (खुला) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणान्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. 

४.१३ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुशेष आहे, सर्वसामान्य रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.


४. १४ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीच वेद प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.


४.१५ सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

तलाठी पदासाठी दिनांक 26 जून 2023 पासून तर 17 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.तलाठी पद भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी.तलाठी पद भरती ऑनलाईन अर्ज सर्वसाधारण संवर्गासाठी एक हजार रुपये तर मागास संवर्गासाठी 900 रुपये.


तलाठी संवर्गासाठी संपूर्ण जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.