पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट - एका उमेदवारासाठी दहा उमेदवार सुचवण्याऐवजी एका उमेदवारासाठी फक्त तीन उमेदवार सुचवणार राज्य मंत्रिमंडळ निर्णय

पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट - एका उमेदवारासाठी दहा उमेदवार सुचवण्याऐवजी एका उमेदवारासाठी फक्त तीन उमेदवार सुचवणार....  राज्य मंत्रिमंडळ निर्णय.


महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे असे मुख्य सचिव यांचे कार्यालयातून 16 जून 2023 रोजी च्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे.


यामध्ये शिक्षण विभागासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असून त्यापैकी पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती मध्ये एका उमेदवारासाठी संस्थेला दहा उमेदवार सुचवले जायचे ते आता एका उमेदवारासाठी फक्त तीनच उमेदवार सुचवले जातील असा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंत्रिमंडळासमोर ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहे.


शिक्षण विभागासाठी इतर काही निर्देश.

नामांकित शाळांची यादीत शाळांचा समावेश होण्यासाठी निकष मान्यतेसाठी क्षमता याबाबत पुनर्विचार करून प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे सादर करावा तसेच अपात्र शाळा कोणाच्या शिफारसी नमकित शाळांच्या यादीत समावेश करण्यात आल्या याची चौकशी करावी.

मुख्य सचिव यांचे स्तरावर शिक्षणाशी संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन बोगस विद्यार्थी संख्या तुकड्या शिष्यवृत्ती इत्यादी गैरप्रकार बाबत आढावा घेऊन उपाययोजना कराव्या.

राज्यातील सर्व शाळांना भेटी देऊन शाळांमध्ये पुरेशी शौचालय आहेत किंवा नाही पाणीपुरवठा करण्यात येत आहे किंवा कसे शाळांच्या बांधकामाची सद्यस्थिती याबाबत तपासणी करण्यात यावी तसेच पीएम गतिशक्ती पोर्टलवर राज्यातील सर्व शाळांची होळी सुविधा बाबत माहितीसह आवश्यक सर्व माहिती नोंदवण्याच्या सूचना देण्यात याव्या.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना डिजीटल कुपन्स देण्याची पद्धती लागू करावी.


राज्यातील सर्व शाळांभोवती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेमधून शाळांच्या संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यासाठी सुचना निर्गमित करण्यात याव्यात.

गुजरात राज्याच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा.

मा. राज्य मंत्रिमंडळाच्या वरील निदेशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तसेच "महाराष्ट्र ई-समिक्षा प्रणालीवर सादर करावा.(मनोज सौनिक) मुख्य सचिव 16/6/23शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.