बदली अपडेट - उद्या 13 मार्च 2023 रोजी निश्चित होणार नेमक्या कोणाच्या होणार अवघड क्षेत्रात बदल्या.

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया 2022 या अंतिम टप्प्यात असून शेवटचा राउंड म्हणजेच अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या जागा भरण्याचा राऊंड सध्या स्थितीत चालू आहे. 




ज्या शिक्षकांना सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होऊन त्यानंतर यापैकी जे शिक्षक संवर्ग एक मध्ये मोडतात त्यांच्यासाठी बदली पोर्टलवर होकार नकार कळवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

व ज्यांनी होकार किंवा नकार संवर्ग एक मधून कळवलेला आहे अशा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी शिक्षणाधिकारी स्तरावर दिनांक 12 मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. 

वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक 13 मार्च 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावरून अवघड क्षेत्रात ज्यांची बदली होईल अशा शिक्षकांची यादी प्रकाशित होणार आहे. 

सदर यादी प्रकाशित झाल्यानंतर नेमकी कोणाला अवघड क्षेत्रात बदली मिळेल हे निश्चित होईल. 

कारण सदर यादीतील शिक्षकांना दिनांक 14 मार्च 2023 पासून 17 मार्च 2023 पर्यंत आपला प्राधान्यक्रम भरण्यासाठी ऑनलाईन बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

जरी प्राधान्यक्रम भरण्याची संधी दिलेली असली तरी ज्या शिक्षकांचे यादीत नाव येईल यांची बदली त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार किंवा जरी प्राधान्य क्रमानुसार शाळा नाही मिळाली तरी देखील उपलब्ध असलेल्या शाळेवर केली जाणार आहे. 

त्यामुळे उद्या दिनांक 13 मार्च 2023 रोजी कोणत्या शिक्षकांची बदली अवघड क्षेत्रात होणार आहे याची यादी प्रसिद्ध होऊन ते निश्चित होणार आहे.

अनेक संघटनांनी अवघड क्षेत्रातील जागा भरण्याचा राउंड रद्द करण्यात यावा अशा प्रकारची निवेदने शासनास दिली आहेत परंतु त्याबाबत कोणताही निर्णय किंवा अधिकृत शासन निर्णय अद्याप प्राप्त झाला नाही.



  



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.