बदली अपडेट - बदली झालेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याशिवाय कार्यमुक्त करता येणार नाही - उच्च न्यायालय.

 बदली अपडेट - बदली झालेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याशिवाय कार्यमुक्त करता येणार नाही - उच्च न्यायालय.


सन 2022 मधील बदली प्रक्रिया ही लांबत जाऊन सन 2022-23 हे सत्र आता संपत आलेले आहे तरी देखील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन व संवर्ग चार अशा चारही संवर्गाच्या बदल्या पोर्टल द्वारे होऊन बदली प्रक्रिया जवळपास आता अंतिम टप्प्यात आहे.

वरील पार्श्वभूमीवर बदली झालेल्या शिक्षकांना असा प्रश्न पडला आहे की आपल्याला सध्या कार्यरत असलेल्या शाळेतून कधी कार्यमुक्त करतात व नवीन मिळालेल्या शाळेत कधी रुजू होता येईल.

परंतु यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचीकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सदर निर्णयानुसार शिक्षकांना सत्राच्या मध्येच कार्यमुक्त करता येणार नाही जर मध्येच शिक्षकांना कार्यमुक्त केले तर विद्यार्थ्यांची गैरसोय होईल नवीन आलेल्या शिक्षकाला नेमका कोणता सिल्याबस शिकवायचा किंवा परीक्षा कशी घ्यायची हे कळणार नाही त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर सदर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे व नवीन शाळेत रुजू करून घ्यावे असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या निर्णयात दिल्या आहेत.

बदली प्रक्रिया पार पडत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी सदर निर्णयातून आपल्याला दिसून येते.


म्हणजेच आता बदली झालेल्या शिक्षकांना कमीत कमी एप्रिल 2023 पर्यंत सध्या कार्यरत असलेल्या शाळेतच काम करावे लागणार व एप्रिल महिन्याच्या शेवटी त्यांना कार्यमुक्त करून मिळालेल्या नवीन शाळेत रुजू होण्यासाठी जाता येणार.






न्यायालयाचा वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.