शिक्षक भरती अपडेट - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी(TAIT) - 2022 अर्ज करण्यास मुदतवाढ.

 शिक्षक भरती अपडेट - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी(TAIT) - 2022 अर्ज करण्यास मुदतवाढ.


 दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान आयोजित केली जाणार असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी याबाबत प्रकटन जाहीर केले आहे.



महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT -2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

TAIT - 2022 अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक.. 👇


TAIT - 2022 अर्ज सादर करण्यासाठी कालावधी.. 

दिनांक 31 जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2023 

परीक्षेकरता ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक.
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 11:59 वाजेपर्यंत

प्रवेश पत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याच्या कालावधी.

दिनांक 15 फेब्रुवारी 2013 पासून.. 

ऑनलाइन परीक्षा दिनांक.
दिनांक 22 फेब्रुवारी 2023 चे दिनांक 3 मार्च 2023..
(प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधांच्या नुसार यामध्ये बदल होऊ शकतो.) 






परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम पात्रता अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबत अधिक सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

www.mscepune.in


अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता दहावी इयत्ता बारावी पदविका पदवी इत्यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिवंगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्यावत रंगीत फोटो स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी स्वतःच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाइन आवेदन पत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.

सदर परीक्षेत व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवाराशी एसएमएस किंवा ई-मेलद्वारे संपर्क होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी अचूक द्यावा.

ऑनलाइन आवेदन पत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रति जोडण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पूर्ता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल ऑनलाइन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द करण्यात येईल.



 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.