सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता अपडेट.

 सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता अपडेट. 


शिक्षण अधिकारी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय जळगाव ने दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोग तिसरा हप्ता देयक सूचना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याचे देयकाबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

सदर देयके दिनांक 8 जानेवारी 2023 ते 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने या कार्यालयास सादर करावी सेवानिवृत्त झालेल्या व माहिती फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत निवृत्त होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे देयक ऑफलाइन पद्धतीने स्वतंत्रपणे सादर करावीत.

पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे देयकी अद्याप अप्राप्त आहेत अशा कर्मचाऱ्यांचे मागील देयकाच्या झेरॉक्स प्रति सोबत जोडून सादर करावे.

1) देखा सोबत लेखाधिकारी शिक्षण विभाग यांनी सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन निश्चिती केलेल्या आयोगाच्या सत्यप्रती व फरक तक्ते सादर करावेत.

मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र देखा सोबत सादर करावे.

मयत कर्मचाऱ्यांचे पाचही हप्त्यांचे एकत्रित देयक सादर करावे (यापूर्वी सातवा वेतन आयोगाचा हप्ता अदा केला असल्यास तो हप्ता वगळून) 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावासमोर सेवानिवृत्ती दिनांक नमूद करून कार्यमुक्ती आदेशाची प्रत सोबत जोडावी.

फरक पत्त्याची मुख्याध्यापक यांनी तपासणी करून कोणत्याही कर्मचाऱ्यास जादा रक्कम अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे देयके स्वतंत्ररित्या सादर करावीत.

नियमित वेतन घेत असलेल्या शालार्थपणे प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ऑनलाईन ऑफलाईन सातवा वेतन आयोग तिसरा हप्त्याची देयके माहीत जानेवारी 2022 मध्ये सादर करू नयेत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments