PM-Poshan Update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळा एलपीजी गॅस कनेक्शन देण्याबाबत परिपत्रक

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळा एलपीजी गॅस कनेक्शन देण्याबाबत परिपत्रक.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे पुणे दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्याबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2019 20 या वर्षाच्या केंद्र शासनाच्या प्रस्ताव मान्यता मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व 100% शाळांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा होणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन जोडणी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल या सार्वजनिक क्षेत्रातील महामंडळाकडून देण्याकरिता शासनाने निर्णय घेतला होता.


सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून एक सिलेंडर टाकीचे शेगडीसह गॅस जोडणी उपलब्ध करून घेण्यासाठी रुपये 4090 याप्रमाणे रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.


शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या शाळांच्या माहितीच्या आधारे 490 याप्रमाणे सदरचे मंजूर अनुदान संबंधित शाळांच्या बँक खात्यावर शिक्षण संचालनालय स्तरावरून वितरित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन बाबतची माहिती सादर करण्यासंदर्भात पत्रान्व शासनाने निर्देश दिलेले आहेत. फक्त निर्देशाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.