NEP 2020 Update - 5+3+3+4 आकृतीबंध अंमलबजावणी बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन राजकीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंतर विभागीय समिती गठित करणे बाबत दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे.
हिंदी मंत्रिमंडळाच्या 29 जुलै 2020 रोजी च्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे मुख्यतः पाच स्तंभावर आधारित आहे. 1) Access (सर्वांना सहज शिक्षण) 2) Equity ( समानता) 3) Quality ( गुणवत्ता) 4) Affordability ( परवडणारे शिक्षण) 5) Accountability ( उत्तरदायित्व/जबाबदारी)
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.
रचना.
प्रथम पाच वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची तीन वर्षे व इयत्ता पहिली व दुसरीचा समावेश असून या स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये खेळ शोध कृती आधारित शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी इयत्ता तिसरीत प्रवेशित होईपर्यंत त्या समज पूर्वक वाचन व लेखन करण्यास सक्षम बनवण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार आहे. या प्रकारे अभ्यासक्रमामध्ये निर्मितीसाठी स्थानिक खेळणी स्थानिक भाषांचा समावेश असून आनंददायी अभ्यासक्रम हॅपीनेस करिक्युलम तयार करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गांमध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकास साध्य करण्यात येणार आहे. त्यापुढील तीन वर्षांमध्ये इयत्ता सहावी ते आठवी करिता कृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक हस्तकला व कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात 40 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वास्तव महत्त्व कमी करण्यात येईल. उच्च माध्यमिक वर्गामध्ये कला विज्ञान वाणिज्य हा शाखा भेद न ठेवता आवडीचे विषय निवडता येतील तसेच पुढे पदवी पातळीवरही आवडीचे विषय निवडता येतील.
अभ्यासक्रम.
अभ्यासक्रमातील ओझे कमी करून खेळ, कृती, शोध आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबोध आकलन, उपयोजनावर भर, गणिती दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन सर्जनशील विचार, चिंतनशील विचार, सहसंबंधात्मक अध्ययन संवाद कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.
केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची अवास्तव महत्व कमी करून कौशल्य क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे. अध्ययन निष्पत्तीच्या आधारे मुलांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. केवळ गुण न नोंदवता क्षमता कौशल्य विकासनाची स्थिती प्रगती पुस्तकात नोंदवून सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे.
मूल्यांकन.
मूल्यांकन हे बहुआयामी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामधील गुणांचे महत्त्व कमी करून बहुआयामी मूल्यांकनांची संकल्पनेचा स्वीकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केला आहे. ज्यात स्वयं मूल्यांकन, सहअध्यायी मूल्यांकन, शिक्षण मूल्यांकनासोबतच विद्यार्थ्यांचे भावात्मक, सामाजिक, बोधात्मक, क्रियात्मक प्रगतीच्या आधारे सातत्यपूर्ण मूल्यांकन करण्यात येणार आहे.
शिक्षक प्रशिक्षण.
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या प्रगती व विकासाच्या अनुषंगाने त्यांना सक्षम बनवण्यासाठी नियतकालिक प्रशिक्षणाचे आयोजन करून गुणवत्ता आधारित पदोन्नती प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळे त्यानुसार शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. टीईटी चाचणीचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे शिक्षकांची निवड केली जाणार आहे.
वरील सर्व गोष्टी करण्यासाठी
महिला व बालविकास विभाग,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,
आदिवासी विकास विभाग,
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,
या सर्व विभागाचे सहाय्य व समन्वय घडवून आणण्यात येणार आहे.
व त्यासाठी नमूद कार्याच्या राज्यस्तरावरील समन्वय संयंत्रण व मार्गदर्शनासाठी अंतर विभागीय समिती स्थापन करण्यात येत आहे. ज्यामध्ये वरील सर्व विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपा डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments