PM SHRI School - केंद्र पुरस्कृत आदर्श शाळा निर्माण योजना पी एम श्री स्कूल निवड प्रक्रिया, पात्रता निकष, सुविधा एम पी एस पी राज्य प्रकल्प संचालकांचे पत्र

PM SHRI School - केंद्र पुरस्कृत आदर्श शाळा निर्माण योजना पी एम श्री स्कूल निवड प्रक्रिया, पात्रता निकष, सुविधा एम पी एस पी राज्य प्रकल्प संचालकांचे पत्र.


समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार पीएम श्री स्कूल या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

माननीय वित्त मंत्री भारत सरकार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सुमारे पंधरा हजार पेक्षा जास्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मलबजावणीसाठी आदर्श शाळा निर्माण करण्याची घोषणा केली. माननीय पंतप्रधान यांनी दिनांक पाच सप्टेंबर 2022 रोजी पीएमसी योजनेचा शुभारंभ केला आहे पीएम श्री स्कूल हे केंद्र पुरस्कृत योजना भारत सरकारने 2022 23 पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विविध तरतुदी ची अंमलबजावणी करावयाची असून त्या माध्यमातून उत्कृष्ट पायाभूत भौतिक सुविधा योग्य संसाधने आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल वातावरण व उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्व समावेशक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्य शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत.

योजनेचे उद्दिष्टे:-

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी करणाऱ्या अनुकरणीय शाळा म्हणून विकसित करणे.

या योजनेचा मुख्य उद्देश देशात 14,500 पेक्षा अधिक उत्कृष्ट शाळा तयार करणे आहे.

शाळांमध्ये उत्कृष्टभौतिक पायाभूत सुविधा आणि योग्य संसाधने उपलब्ध करून देणेनुसार एक समान 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक समाज उपयोगी आणि समाजाप्रती योगदान देणारे नागरिक घडवणारे विद्यार्थी तयार करणे.

या शाळांमधून Experiential, Holistic, Integrated, Play/toy-based, inquiry-driven, Discovery-Oriented, Learner-Centred, Discussion-based, flexible and Enjoyable शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे.

प्रत्येक इयत्तेसाठी प्रत्येक मुलांच शिक्षणाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून त्याच्या तारखीक कौशल्याचे मूल्यंकन करणे विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाचा वापरावर आणि योग्य तेवर आधारित मूल्यांकन करणे चाचणी घेणे व्यावसायिक शिक्षणासाठी कौशल्य आधारित अभियोग्यतेचा शिक्षण देणे.

या शाळांमध्ये समाज आणि माजी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मेंटेन टू स्टुडंट्स अतिरिक्त पूरक मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करणे.

सर्व मुलांना शाळेत दाखल करून त्यांची नियमित उपस्थिती टिकून ठेवून त्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे काही कारणास्तव त्यांची भरती झाली असल्यास ते शिक्षणात मागे पडले असल्यास त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करणे व पुन्हा प्रवेश देणे.

या शाळांनी शिक्षणात अग्रेसर म्हणून कामगिरी पार पाडावी आणि कालांतराने शेजारच्या शाळांना या शाळेचे अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करावे.

या शाळा औद्योगिक क्रांतीच्या नुसार उदंड अर्थव्यवस्थेच्या आवश्यकता नुसार align करणे.


योजनेचे स्वरूप.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांना निकषानुसार यामध्ये सहभागी होता येईल. एनईपी 2022 च्या शिफारशी लक्षात घेऊन या शाळांमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा आणि सुरक्षित पायाभूत सुविधांसह विद्यमान पायाभूत सुविधांची सक्षमीकरण करण्यात येईल.

सर्व शाळांमध्ये कार्यरत स्वच्छतागृहे स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छ आणि आकर्षक जागा वीज संगणकीय उपकरणे इंटरनेट ग्रंथालय शैक्षणिक साहित्य भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा आणि क्रीडा आणि मनोरंजनाची साधने सौर पॅनल आणि एलईडी लाइटिंग चा वापर करून ऊर्जा कार्यक्षम नैसर्गिक शेतीसह पोषण बागा कचरा व्यवस्थापन प्लास्टिक मुक्त पाणी सॅनिटायझेशन फॅसिलिटीज वेस्ट मॅनेजमेंट सेफ्टी प्रोविजनस रेन वॉटर हार्वेस्टिंग वॉटर ऑडिटिंग जलसंधारण आणि कापणी परंपरा पद्धतीचा अभ्यास यासारख्या पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करून या शाळा ग्रीन स्कूल म्हणून विकसित केल्या जातील.

ICT, smart classrooms, and digital libraries, Science Technology Engineering Maths Innovation Centre, Balvativa and Foundational Literacy and Numeracy, vocational Education, Psychological and Career Counselling, Transportation Facilities, Special Equity Projects, Sanitary pad vending and vending and Incinerators, Self-defense Training इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जातील.


शाळा निवडीचे निकष:-

पी एम श्री अंतर्गत शाळेची निवड प्रामुख्याने या निकषांच्या आधारे केली जाईल ज्यामध्ये.

यु-डायस स्कूल असणाऱ्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ज्यांची पटसंख्या ही राज्य अथवा जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा जास्त असणाऱ्या शाळा.

शाळेची स्वतःची पक्की इमारत असणारी मुला-मुलींसाठी प्रत्येकी किमान एक स्वतंत्र शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय हात धुण्याची सोय शाळेत कार्यरत स्थितीत वीजपुरवठा असणाऱ्या शाळा.

बेरियर फ्री एसएस रॅम्स लायब्ररी कॉर्नर फॅसिलिटी स्पोर्ट इक्विपमेंट ची सुविधा असणाऱ्या शाळा.

पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित क्षेत्रात असणारी शाळा, 

शाळेतील शिक्षकांनी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला असावा.

सर्व शिक्षकांचे विद्यमान मार्गदर्शक तत्त्वानुसार फोटो ओळखपत्र असावी.

शाळेने प्राथमिक वर्गासाठी आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण आणि विषय शिक्षकांसह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी समग्र शिक्षा निकषानुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण निकषांची पूर्तता केली असावी.

मुलांची गळती रोखण्यासाठी व दिव्यांग मुलांना सर्व समावेशक शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या असावेत.

आर टी कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती गठित केलेली असावी.

शाळेच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली असावी.

राज्याने निवडलेले शाळा पीएम श्री शाळांमध्ये विकास करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्धता विद्यार्थी शिक्षक प्रमाण राखणे साठी करून देण्याचा वचनबद्धता केंद्र शासनास देणे आवश्यक राहणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक भरती बदली आणि करिअर प्रोग्राम प्रणालीची पारदर्शक प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे राहणार आहे.

पारदर्शक शिक्षक व्यवस्थापन प्रणाली चा अवलंब करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल.


पी एम श्री शाळांची निवड प्रक्रिया.

यु-डायस प्लस 2021 22 च्या माहितीच्या आधारे व नमूद किमान बेंच मार्किंग पॅरामीटर्सच्या आधारे पीएम श्री शाळा निवडण्यासाठी एकूण 65,500 शाळांपैकी निकषानुसार पात्र असलेल्या 16219 शाळांची यादी भारत सरकारने तयार केलेली आहे त्यामध्य 16219 शाळा पीएमसी पोर्टलवर स्वतः अर्ज करतील.

अर्जसमिट केल्यावर ज्या शाळांनी शहरी भागात किमान 70% आणि ग्रामीण भागात किमान 60% गुण मिळवलेले आहेत त्या शाळा पोर्टल वरील जिल्हा नोडल ऑफिसर च्या लॉगिन वर मूल्यांकनासाठी उपलब्ध होतील. त्यांची पडताळणी करून प्रमाणित केलेली यादी राज्यास घटनेहाय पीएम श्री शाळांची शिफारस केलेली यादी राज्याकडे पाठवली.

त्यामधून प्रत्येक गटातून जास्तीत जास्त दोन शाळांची अंतिम निवड करण्यासाठी त्याप्रमाणे पुनर पडताळणी व प्रमाणित करून शिफारशींसह केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयास पीएम श्री शाळांची यादी अंतिम पाठवण्यात येईल.

राज्याने शिफारस केलेल्या शाळांमधील पीएमसी शाळांची अंतिम निवड केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात येईल.


जिल्ह्यांकडून करावयाची कार्यवाही:-

भारत सरकारने विहित केलेल्या निकषांच्या आधारे राज्यातील एकूण 65 हजार शाळांपैकी 16219 शाळांची यादी

https://pmSHRIschools.education.gov.in/user/login

या पोर्टलवर जिल्हा निहाय उपलब्ध असून सुलभ संदर्भासाठी सदर परिपत्रकासोबत देखील शाळांची यादी देण्यात आलेली आहे.वडील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

 Download
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.