बदली अपडेट - बदली पात्र शिक्षकांची याद्या पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत Vinsys चा आजचा नवीन व्हिडिओ

बदली अपडेट - बदली पात्र शिक्षकांची याद्या पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत Vinsys चा आजचा नवीन व्हिडिओ. 


बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध कशा व का कराव्यात?  


याबाबत  बदली पोर्टल ( Vinsys) कडून आज नवीन आलेला सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ आवश्य पहा.. 

संवर्ग एक व संवर्ग दोन साठी कागदपत्रे पडताळणी गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यासाठी मुदतवाढ वाढवून देऊन 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात आली होती ती आज संपत आहे.

आज संध्याकाळी उशिरा किंवा उद्या सकाळी संवर्ग एक व संवर्ग दोन मधून बदली करणाऱ्या शिक्षकांची यादी पोर्टलवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सदर याद्या पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी इतर शिक्षकांना वेळ देण्यात येईल.

त्या आक्षेपांवर शिक्षणाधिकारी स्तरावर पडताळणी होऊन आक्षेप निकाली काढले जातील.

त्यानंतर त्या निकालावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्या साठी वेळ उपलब्ध होईल.

अंतिमतः मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून सदर आक्षेप यावर निर्णय घेऊन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 ह्या अंतिम याद्या प्रसिद्ध होतील.


वरील सर्व गोष्टींसाठी वेळेत काम पूर्ण नाही झाले तर बदली प्रक्रिया पुढे पुढे ढकलत जाईल.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.