जिल्‍हांतर्गत बदल्‍या २०२२ शिक्षक प्रोफाइल माहिती अपडेट करण्यासंबंधी सूचना व्ही सी 8 सप्टेंबर 2022.

जिल्‍हांतर्गत बदल्‍या २०२२ शिक्षक प्रोफाइल माहिती अपडेट करण्यासंबंधी सूचना व्ही सी 8 सप्टेंबर 2022.


 जिल्‍हांतर्गत बदल्‍या २०२२



 दि ०८/०९/२०२२ रोजी झालेल्‍या व्‍हीसी मध्‍ये दिलेल्‍या सूचनेनुसार प्रत्‍येक शिक्षकाची सध्‍याच्‍या क्षेत्रात (अवघड/ सोपे) रुजू झाल्‍याची तारिख आपल्‍याला आवश्‍यक आहे. या कार्यालयाचे जा.क्र. कार्या-१/पीई-६/२१३ दि ०६/०९/२०२२ या पत्रासोबत दिलेल्‍या Excel File मध्‍ये आपल्‍याला सर्व शिक्षकांची सध्‍याच्‍या क्षेत्रात (अवघड/ सोपे) रुजू झाल्‍याची दिनांक नमुद करायची आहे. त्‍याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.


१.       Date Format- Excel File 

आपल्‍या संगणकावर Open करण्‍यापूर्वी संगणकाचा Date Format DD/MM/YYYY असा करुन घ्‍यावा म्‍हणजे फाईल मधील तारखांमध्‍ये तारीख व महिना यांची आपोआप आदलाबदल होणार नाही. तदनंतर सदर Excel File मधील आपला तालुका वगळता इतर तालुक्‍यांची माहिती Delete करावी.


२.      नावे Add/ Delete करणे- 

माहितीमध्‍ये अं.जि.ब. २०२२ नुसार अंतर जिल्‍हा बदलीने कार्यमुक्‍त केलेल्‍या तसेच मयत, सेवानिवृत्‍त तसेच सेवानिलंबित झालेल्‍या शिक्षकांची नावे आलेली आहेत. सदरची नावे आपल्‍याला Delete करावयाची आहेत अशा शिक्षकांच्‍या नावांपुढे तसा शेरा नमुद करावा. तसेच कोणी शिक्षक पुर्नस्‍थापित झाले असतील तर त्‍वरीत संपर्क करावा.


३.      Current School Joining Date-

 मध्‍ये सध्‍याच्‍या शाळेवरील अचूक रुजू दिनांकच टाकावी. (अंतर जिल्‍हा बदलीने जिल्‍ह्यात हजर झाल्‍यानंतरची पहिलीच शाळा असेल तर जिल्‍ह्यातील हजर दिनांक हीच शाळेवरील हजर दिनांक आहे.)


४.     आंतर जिल्‍हा बदली

 काही आपसी अंतरजिल्‍हा बदलीने हजर झालेल्‍या प्राथमिक शिक्षकांनी आपसी बदलीमधील दोघांपैकी कनिष्‍ठ कर्मचारी यांची सेवा ग्राह्य धरलेली आहे. तथपि मा. मु.का.अ. जि. प. अहमदनगर यांचे दि १७/०८/२०२२ चे पत्रान्‍वये आपसी आंतरजिल्‍हा बदलीने आलेल्‍या शिक्षकांची जिल्‍हांतर्गत बदलीसाठीची जेष्‍ठता विद्यमान जिल्‍हा परिषदेत प्रत्‍यक्ष रुजू झाल्‍याच्‍या दिनांकापासून गणण्‍यात येणेबाबत सुचित केलेले आहे. तरी आपसी आंतरजिल्‍हा बदलीने हजर झालेल्‍या शिक्षकांची अहमदनगर  जिल्‍ह्यातील हजर दिनांक Current District Joining Date या रकान्‍यात नोंदवावी.


५.     Current Area Joining Date- 

Current District Joining Date व Current School Joining Date या दोन Column मध्‍ये एक Column Add करावा. या रकाण्‍याला Current School Area Joining Date (Difficult/ Non Difficult ) असे नाव द्यावे.


६.      Current School Area Joining Date (Difficult/ Non-Difficult)- 

या रकाण्‍यात संबंधीत शिक्षक सध्‍या ज्‍या शाळेत कार्यरत आहे त्‍या शाळेचे जे क्षेत्र आहे (सोपे/ अवघड) त्‍या क्षेत्रात ते केंव्‍हापासून कार्यरत आहे ती दिनांक नमुद करावी. सध्‍याच्‍या शाळेचे क्षेत्र ठरवताना सन २०१९ च्‍या अवघड क्षेत्राची यादी गृहीत धरावी. सध्‍याच्‍या शाळेच्‍या क्षेत्रात (सोपे/ अवघड) रुजू झाल्‍याची तारीख नोंदवीताना नोंदवीलेल्‍या तारखेपासून संबंधीत शिक्षक सलग (शाळा बदलली असेल तरी) त्‍याच क्षेत्रात कार्यरत असावा.


७.     Worked 10 Years- 

ही बाब काळजीपूर्वक तपासावी कारण येथील माहितीवर शिक्षक बदलीपात्र आहे अथवा नाही हे ठरते. या रकाण्‍यात सध्‍याच्‍या क्षेत्रात (सोप्‍या किंवा अवघड) दि ३०/०६/२०२२ या संदर्भ दिनांकास जर सलग १० वर्षे सेवा झाली असेल तर Yes येईल व नसेल तर No येईल.


८.     ELIGIBLE- 

संदर्भ दिनांकास सध्‍याच्‍या क्षेत्रात १० वर्षे व सध्‍याच्‍या शाळेत ५ वर्षे सेवा असे दोन्‍ही निकष ज्‍या शिक्षकाचे पूर्ण होत असतील ते बदलीपात्र होतील (ELIGIBLE). दोन्‍हीपैकी एक जरी निकष पुर्ण होत नसेल तर ते शिक्षक बदलीपात्र होणार नाहीत.


९.      ENTITLED-

 सन २०१९ च्‍या अवघड क्षेत्राच्‍या शाळांमध्‍ये कार्यरत शिक्षकांना संदर्भ दिनांकास सलग ३ वर्षे पुर्ण होत असलील तर ते बदली अधिकारप्राप्‍त (ENTITLED) होतील. जर अवघड क्षेत्रात विहित कालवधी पुर्ण होत नसेल तर बदली अधिकारप्राप्‍त होणार नाहीत (NOT ENTITLED).


१०.  दुरुस्‍तीचा नमुना-

 Current School Area Joining Date (Difficult/ Non-Difficult) या रकाण्‍यातील माहिती आपण सादर केलेल्‍या Excel File मधुन घेण्‍यात येईल व इतर काही दुरुस्‍ती असेल तर दि ०६/०९/२०२२ रोजीच्‍या पत्रातील विहित नमुन्‍यात सादर करावी.


११. Background Color-

ज्‍या माहितीमध्‍ये बदल केला आहे त्‍या Cell चा Background Color Yellow (पिवळा) करावा व फक्‍त आपल्‍याच तालुक्‍याच्‍या माहितीची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी विहित मुदतीमध्‍ये कार्यालयास माहितगार कर्मचा-याच्‍या हस्‍ते सादर करावी.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.