आंतरजिल्हा बदली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळापत्रक बाबतचे महत्त्वाचे आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र

 आंतरजिल्हा बदली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळापत्रक बाबतचे महत्त्वाचे आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र. 


आज दिनांक एक ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदली 2022 आंतरजिल्हा बदल्या वेळापत्रक जाहीर करणारे पत्र पुढीलप्रमाणे. 


बहुप्रतीक्षित ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक 6 ऑगस्ट 2022 पासून 9 ऑगस्ट 2022 पर्यंत शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे अंतर जिल्हा बदलीची कार्यवाही दिनांक 10 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या तीन दिवसात होणार आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित होणार आहेत. 


जिल्हा परिषद शिक्षकांचे रोस्तर म्हणजेच बिंदू नामावली दिनांक 2 ऑगस्ट ते तीन ऑगस्ट 2022 या दोन दिवसात अपलोड करावयाची आहे. 

दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी सर्व जिल्हा परिषदांची रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली प्रसिद्ध होणार आहे. 

सर्व शिक्षकांना अवलोकनाससाठी बिंदू नामावली दिनांक 4 व 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबत सुधारित धोरण दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णय आणि विहित करण्यात आले आहे सदर धरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन 2022 मधील बदल्या संगणक प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव सदर करण्यात आली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला आहे. मात्र आता ऑनलाईन द्वारे बदल करण्यासाठी कार्यवाही पूर्ण झाली असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत वेळापत्रक आजच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे होणाऱ्या आंतरजिल्हा बदल्याबाबतची कार्यवाही वेळापत्रक अनुसार कळविण्यात यावी तसेच सदरची बाब आपल्या अधिनिष्ठ सर्व प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी व आपल्या अभिलेखांमध्ये जतन करून ठेवावे असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव का गो वळवी यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नावे निर्गमित केले आहे. 



वरील आंतरजिल्हा बदली संदर्भातील वेळापत्रक म्हणजेच ग्रामविकास विभागाचा शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.