बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती बद्दल संपूर्ण माहिती

 बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती बद्दल संपूर्ण माहिती.


राज्यातील मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख पारसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक मुलींसाठी केंद्र शासनाची बेगम हजरत राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही योजना पूर्वी अल्पसंख्यांक मुलींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जात होती ती दिनांक 3 मे 2003 रोजी भारताचे तत्कालीन माननीय पंतप्रधान यांनी सुरू केली होती.

सदर योजनेमधून अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता नववी व दहावीच्या मुलींना वार्षिक रुपये 5000 व इयत्ता अकरावी व बारावी मधील मुलींना वार्षिक रुपये 6000 शिष्यवृत्ती देण्यात येते.

सन 2022 23 या वर्षासाठी इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थिनींनी केवळ ऑनलाइन पद्धतीने फक्त नववी मधून दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत.


www.scholarship.gov.in


वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचे आहेत.


शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी व शर्ती.

सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय निम शासकीय खाजगी अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअंकाने अर्थसहित शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता नववी ते बारावीच्या मुलींसाठी ही योजना लागू आहे.

अर्जदार विद्यार्थिनीं मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुण आणि उत्तीर्ण झालेली असावी.

पालकाचे अर्थात कुटुंबाचे एकत्रित वर्ष उत्पन्न रुपये दोन लाखापेक्षा कमी असावे.

पालकाची वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.

एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळणार नाही.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती बँक व आधार माहिती अचूक भरावी.

धर्माबाबत स्वयंघोषणापत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र गुणपत्रक आधार कार्ड अथवा आधार नोंदणी पावती विद्यार्थ्यांचा फोटो बँक पासपोर्टच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावी.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.शाळेसाठी सर्वसाधारण सूचना.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे वर्णनिहाय व वर्षनिहाय किमान पाच वर्ष जतन करून ठेवावे.
ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेत शासनाची मान्यता आहे परंतु वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारू नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास तसे सर्व अर्ज रिजेक्ट किंवा फेक मार्क करावे.
शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी शाळेत मध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळा स्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी यासाठी अर्ज डिफेक्ट करावा विद्यार्थ्यांना संधी देऊनही माहिती चुकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेक मार्क करण्यात यावा.
शाळांचे मुख्याध्यापक व नडोल ऑफिसर यांची माहिती आधारनुसार माहिती एन एस पी 2.0 या पोर्टल वरती भरण्यात यावी.
सन 2015 16 पासून शिष्यवृत्ती वितरण केंद्रशासनामार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोड द्वारे करण्यात येत आहे.

सर्वसाधारण सूचना

सन 2021-22 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिवशक्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सण 2022 23 करिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल तसेच एका विद्यार्थ्याने नवीन नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
विद्यार्थ्यांची बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे नसल्यास पालकाचे राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल.
विद्यार्थ्यांची नवीन व नूतनीकरणाचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एन एस पी 2.0


या वरील संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहिली.

बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक वर्षी अर्ज नवीन मधून भरायचा आहे.
पोर्टलवर विद्यार्थ्याचे अर्ज कोणत्याही एका शिष्यवृत्तीसाठी भरण्यात यावा.

अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे हा क्रमांक पालकाचा असेल तर तो दोन पाल्यांसाठीच वापरता येईल.

ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी आल्यास वेबसाईटच्या होम पेजवरील फ्रिक्वेन्टी आस्क क्वेश्चन्स एफ ए क्यू चा वापर करावा.वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.