शासकीय शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बीएसएनएल संकेतस्थळावरून ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बाबत राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र.

 शासकीय शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बीएसएनएल संकेतस्थळावरून ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बाबत राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे संचालक यांनी दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार शासकीय शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बीएसएनएल संकेतस्थळावरून ऑनलाइन प्रस्ताव सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.


भारत सरकार व बीएसएनएल यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असल्याची कळविले आहेत. कराराच्या अनुषंगाने भारत सरकारकडून ज्या शासकीय शाळांमध्ये संगणक अथवा आयसीटील यात आहे परंतु इंटरनेट सुविधा कार्यरत नाही अशा शाळांनी ऑनलाइन बीएसएनएलच्या


 https://ruralfiber.bsnl.co.in/ruralfiber/MainAction.do


या वरील वेबसाईटवर नोंदणी करण्याकरता कळविले आहे.

प्रामुख्याने संदर्भीय पत्रानुसार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ज्या शाळांना संगणक अथवा आयसीटी लॅब आहे परंतु इंटरनेट सुविधा नाहीत अशा शाळांना लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास कळविले आहे.

आपणास कळविण्यात येते की लवकरात लवकर आपल्या स्तरावरून शासकीय शाळांना इंटरनेट सुविधे बाबतचा प्रस्ताव बीएसएनएल संकेतस्थळावर सादर करण्याकरिता कळविण्यात यावे व त्याबाबत आढावा घेऊन ज्या शाळांनी प्रस्ताव सादर केला आहे अशा शाळांचा एकत्रित प्रस्ताव कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा.

वरील प्रमाणे सूचना राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई व शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांना दिल्या आहेत.



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.