आता शिक्षणाधिकारी यांना दोन लाखापर्यंत चे वैद्यकीय देयक/मेडिकल बिल मंजूर करण्याचे अधिकार - शिक्षण आयुक्त कार्यालयाचे पत्र

आता शिक्षणाधिकारी यांना दोन लाखापर्यंत चे वैद्यकीय देयक/मेडिकल बिल मंजूर करण्याचे अधिकार - शिक्षण आयुक्त कार्यालयाचे पत्र.


शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आज दिनांक 3 जून 2022 च्या पत्रानुसार राज्यातील शासकीय सरकारी तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयक प्रती पूर्ततेच्या संदर्भातील पत्र पुढील प्रमाणे.

शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 2061 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा अधीन राहून राज्यातील शासकीय सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सैनिकी शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीच्या अनुज्ञा तिची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परिषद व शिक्षण निरिक्षक पश्चिम/दक्षिण/उत्तर, मुंबई हे दोन लक्ष पर्यंतचे वैद्यकीय देयके ला मंजुरी देऊ शकतात.

विभागीय शिक्षण उपसंचालक हे दोन लक्ष पेक्षा जास्त परंतु तीन लक्ष पर्यंत ची वैद्यकीय दे यांना मंजुरी देऊ शकतात.
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख यांना तीन लक्ष पेक्षा जास्त वैद्यकीय देयक त्यांना मंजुरी देण्याचे अधिकार असतात.

शासन निर्णयास अनुसरून वरील अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या शाळा तील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय देयक काय झालं प्रदीप ती संदर्भात तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे याबाबत माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भात तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे सूचित केले असून प्राप्त होणारी प्रकरणे परिपूर्ण असल्यास नियमानुसार तात्काळ मंजूर करण्याचे व प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास त्याप्रमाणे तात्काळ त्रुटी पूर्ततेसाठी प्रस्ताव परत करून प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश केले आहे.
तसेच प्रकरणी दिनांक 31 5 2022 पर्यंत आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत सदर निर्देशांचे अनुसरण प्रपत्र अ ब क अनुक्रमे शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक शिक्षण उपसंचालक व अधिक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक शाळा व यादी तयार करण्यात आली असून सदर पत्र सोबत जोडले आहे.
माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देश विचारात घेऊन आपणास संबंधित असलेल्या सोबतचा प्रतीक 31 मे 2022 पर्यंत ची वस्तुस्थितीदर्शक माहिती दिनांक 10 जून 2022 पूर्वी पत्रात दिलेल्या ईमेल आयडीवर न चुकता सादर करण्याचे निर्देश देखील आयुक्तालयातील या पत्रानुसार देण्यात आले आहे.

वरील शिक्षण आयुक्तालय तील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.