शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये राबविला जाणार पुनर्रचित सेतु अभ्यास - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र

 शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये राबविला जाणार पुनर्रचित सेतु अभ्यास - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे चे संचालक एम डी सिंह यांचे स्वाक्षरीने निर्गमित आज दिनांक 3 जून 2022 रोजीचे पत्रानुसार पुनर्रचित सेतू अभ्यास दोन हजार बावीस तेवीस ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षण उपनिरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर मुंबई,  शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका व नगरपालिका, प्रशासन अधिकारी सर्व नगरपरिषद यांना देण्यात आले आहे.

Covid-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये नियमित शाळा होऊ शकल्या नाही या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा रास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण 2019 नुसार भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयात राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी कमी दिसून येत आहे या या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता निहाय आणि विषय निहाय समता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांतून सुरू राहावे याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्याय रहास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये राज्यस्तरावर विकसित केलेल्या 45 दिवसाच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आली होती. सेतु अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतु अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाले आहे.

शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय आणि विषय निहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे राज्य स्तरावरून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये देखील सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतु अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप

1) इयत्ता दुसरीचे दहावीच्या मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

2) सदर अभ्यास इयत्ता निहाय व विषय निहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

3) पुनर्रचित शेती अभ्यास हा एक दिवसाचा असून यामध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आल्या आहेत तसेच सदर अभ्यास मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी तयार करण्यात आला आहे.

4) सदर पुनर्रचित अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

5) सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मध्यान करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. तसेच अधिक समृद्ध ते करिता साहित्याच्या लिंक्स देखील देण्यात आलेल्या आहेत.

6) सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवस निहाय सोडवतील या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

7) पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेल्या असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेत स्थळावर दिनांक 9 जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उत्तर चाचणी दिनांक 23 जुलै किंवा दिनांक 6 ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.


पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी.

पूर्व चाचणी ही राज्यातील शाळांसाठी 17 ते 18 जून 2022 तर विदर्भातील शाळांसाठी 1 ते 2 जुलै 2022 रोजी घेण्यात यावी.

30 दिवसांत सेतू अभ्यास दिनांक 20 जून मध्ये 23 जुलै 2022 पर्यंत राहील तर विदर्भातील शाळांसाठी 4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील.

उत्तर चाचणी सोडवण्यासाठी 25 ते 26 जुलै 2022 उत्तर विदर्भासाठी 8 ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत उत्तर चाचणी सोडून घ्यायची आहे.


पुनर्रचित सेतु अभ्यासाची अंमलबजावणी.

सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेची मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतु अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी तील गुन्ह्यांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.

मागील इयत्तांच्या महत्त्वांच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

सदर कृतीपत्रिका शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या ताशी केला सोडून द्याव्यात.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसांची कृतिपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे या कृती पत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषय निहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुन्ह्यांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.

सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याच्या इतकेच या विषयांची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करावी.

शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांचे साठी दिनांक 9 जून दोन हजार बावीस रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीविषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे सदर ऑनलाइन उत्पदन सतरा ची लिंक आपणास ईमेल द्वारे सूचित करण्यात येईल.

सेतु अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेला सर्व घटकांना अवगत करण्यात यावे असे निर्देश देखील सदर पत्रानुसार माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिले आहेत.


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.