शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र देताना देयका च्या एकुण 3 टक्के रकमे मधून सूट.
आज दिनांक 16 जून 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्रासाठी देयकांच्या एकूण रकमेच्या तीन टक्के रक्कम भरावी लागत होती त्यामधून आजच्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद कर्मचारी यांचा समावेश आहे. आता या सर्व शासनमान्य अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील पूर्णकालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कृषी व कृषी तर विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र देयकांच्या एकूण तीन टक्के रक्कम या मधून सूट देण्यात आली आहे.
या अगोदरच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र जगाच्या एकूण रकमेच्या तीन टक्के रक्कम अदा करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. सदर बाब ही शासकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. सन 2015 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक 3244 उपस्थित केला होता. सदर प्रश्नांच्या चर्चेवेळी विधान परिषद सभागृह मध्ये तत्कालीन मंत्री शालेय शिक्षण यांनी ज्याप्रमाणे शासनाने कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के रकमेतून सूट दिलेली आहे. त्याचप्रमाणे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट देणे आवश्यक आहे. त्यांना अशी अट लावणे आवश्यक आहे. सदर तीन टक्क्यांची अट आम्ही रद्द करू असे आश्वासन दिले आहे. सदर आश्वासनांची पूर्तता करणे आवश्यक असल्याने त्यानुसार सर्व शासनमान्य अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन पूर्णकालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कृषी व कृषी विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र देयकांच्या एकूण तीन टक्के रक्कम म्हणून सूट आता देण्यात आली आहे.
वरील महत्वाचा शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments