आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांची जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार.

 आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांची जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार.

माननीय ग्रामविकासमंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार बदली पोर्टल/प्रणाली चे उद्घाटन.

आज दिनांक 9 जून 2022 रोजी दुपारी 4 वाजता माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया साठी तयार करण्यात आलेल्या संगणक सॉफ्टवेअर प्रणाली चे अनावरण कार्यक्रम होणार आहे.

सदर कार्यक्रमास माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार राज्यमंत्री, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन हे विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे.

तर सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री राजेश कुमार, अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व श्री आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे तथा अध्यक्ष संगणकीय आज्ञावली समिती महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे.


वरील कार्यक्रमास दिनांक आठ जून दोन हजार बावीस च्या ग्राम विकास विभागाच्या पत्रानुसार सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे देखील ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत.

 बहुप्रतिक्षित अशी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया आज अखेर सुरू होणार आहे.

बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नेमकी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अगोदर होणार ही जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अगोदर होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे.

ग्रामविकास विभागाने या अगोदर निर्गमित केलेल्या आदेशानुसार दरवर्षी 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया साठी असलेली मुदत वाढवून 30 जून पर्यंत दिलेली आहे. या वाढवून दिलेल्या 30 जून पर्यंत च्या मुदतीच्या अगोदर बदली प्रक्रिया पूर्ण होते की नाही याचेदेखील वेध बदलीपात्र व बदली इच्छुक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना लागले आहेत.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.