आज 10 जून 2022 रोजीचे बदली प्रक्रिया संदर्भातील ग्रामविकास विभागाचा आदेश - बदली अपडेट

आज 10 जून 2022 रोजीचे बदली प्रक्रिया संदर्भातील ग्रामविकास विभागाचा आदेश - बदली अपडेट

आज दिनांक 10 जून 2022 रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया संदर्भात आदेश निर्गमित केला आहे तो पुढीलप्रमाणे.. 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी स्वतंत्र  सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे.सदर आदेशातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक,  विशेष संवाद भाग 2 मधील लोकांची  पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याची   शासन स्तरावरून वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहे.

सदर आदेशामध्ये मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून सदर प्रणाली चे अनावरण गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सन 2022 मध्ये जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून त्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातर्गत/ आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणाली संकेतस्थळ उपलब्ध झाले आहे, सदर संकेतस्थळावर आपल्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच सर्व शिक्षकांना अवगत करावे व सदर संकेत स्थळास दररोज भेट देऊन संकेतसळावर कार्यवाहीची मर्यादा देखील कटाक्षाने  पाळण्याच्या सूचना द्याव्यात.

राज्यात covid-19 तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या संचमान्यता अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत यामुळे सद्यस्थितीत 2021-22 संचमान्यता या सन 2020-21 संच मान्यता प्रमाणे कायम ठेवावेत असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील दिनांक 19 जून 2022 च्या पत्रान्वये दिले आहेत. त्यामुळे सन 2022 व यावर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या 2020-21 संचमान्यता विचारात घेऊन कराव्यात.

Covid-19 आजाराच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषदेच्या बिंदुनामावली विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्या कडून पासून झाली झालं नाही. त्यामुळे आंतर जिल्हा बदली संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदीनुसार यावर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने करावे किंवा विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून यापूर्वी बिंदु नामावली तपासणी करून घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा.

काही शिक्षकांच्या बदल्या संदर्भात माननीय न्यायालयाचे आदेश असल्यास सदर आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. एखाद्या शिक्षकांची ही एका विशिष्ट शाळेतून विशिष्ट शाळेत बदली करण्याचे मान्य न्यायालयाचे विविक्षित निर्णय असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वप्रथम अशा शिक्षकांची ऑफलाइन पद्धतीने बदली करावी.

तसेच काही शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणे फक्त अर्जदार यांच्या बदली संदर्भात विनंतीचा विचार करण्याची माननीय न्यायालयाचे निर्देश असल्यास असे शिक्षक बदली पात्र नसतील तरीही अशा शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळविण्यात यावे व त्यांची पोच ठेवावी.

आंतर जिल्हा बदली प्रकरणात बदलीपात्र शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये जायचे आहे त्या जिल्हा परिषदेकडील बिंदुनामावलीनुसार पद रिक्त असल्याचे भविष्यात पद होणार असल्याची ना हरकत प्रमाणपत्र आहे. अशाच शिक्षकांना ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षकांमध्ये समावेश करावा.

तसेच सदर संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी सेवाज्येष्ठता हाच निकष असल्याने त्यांच्या सेवेसाठी त्याप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात यावी.  सेवा जेष्ठता सारखी असल्यास, एकच असल्यास वयाचा निकष लागू करावा. जन्मदिनांक देखील सारखी असल्यास इंग्रजी  अक्षर माले नुसार प्रथम इंग्रजी अक्षर येणाऱ्यांची सेवाज्येष्ठता जास्त राहील.

संच मान्यता मुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन ऑनलाइन बदली प्रक्रिया नंतर करण्यात यावे.


 संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

1 Comments

  1. लीहण्यात भरपूर चुका आहेत.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.