शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन 2022-23 या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेली की रिझल्ट एरिया (Key Result Area KRA) उद्दिष्टे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन 2022-23 या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेली की रिझल्ट एरिया (Key Result Area KRA) उद्दिष्टे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 मे 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार सन  2022-23 या कालावधीसाठी विभागास दिलेली की रिझल्ट एरिया Key Result Area (KRA) उद्दिष्टे पुढील प्रमाणे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन 2022-23 या कालावधीसाठी तीर रिझल्ट एरिया उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असून राज्याला राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे व दहावीपर्यंत मुलांच्या गळतीचे प्रमाण खाली आणणे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांची आधार जोडणी करणे तसेच शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे राज्यात सर्वोत्तम खेळाडू तयार करण्यासाठी सुविधा निर्माण करणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे साध्य करण्याकरता राज्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम घेण्यात आला असून त्यानुसार प्राथमिक खर्चासाठी 22 जून 2015 व माध्यमिक स्तरासाठी 16 सप्टेंबर 2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत तसेच खेळाडूंसाठी क्रीडा विज्ञान केंद्र बालेवाडी पुणे व महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे सारख्या संस्था विकसित करण्यात येत आहे या विभागाच्या केकेआर नुसार दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
1)प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लर्निंग आऊट कम्स मध्ये 10% वाढ करणे.
2)School MIS प्रणालीचे विकसन करून ते User Acceptance Testing चाट टप्प्यापर्यंत चे काम पूर्ण करणे.
3)शासकीय अनुदानित व आरटीई अंतर्गत 25 टक्के शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ घेणाऱ्या खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी व वैधता पूर्ण करणे.
4)Command Control Center कार्यान्वित करणे.
5)BISAG द्वारे बारा शैक्षणिक चैनल सुरु करणे.
6)इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा e-content विकसित करणे.
7)शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाईन वेतन प्रदानासाठी सीएमपी प्रणाली लागू करणे.
8)वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी च्या शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करून जवळपास 94 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
9)Performance Grading Index मध्ये 50 गुणांनी वाढ करणे.
10)महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे सुरू करणे.
11)भविष्यातील सर्वोत्तम खेळाडू ॲथलिट घडवणे आणि त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी भारतातील सर्व उत्कृष्ट क्रीडा विज्ञान केंद्र बालेवाडी पुणे येथे विकसित करणे.
12)समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.
13)स्टार्स प्रकल्पांतर्गत मंजुरी आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.
14)मध्यान्न भोजन अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे.
15)विभागाच्या व अखत्यारीतील कार्यालयांचा आकृतिबंध मंजूर करणे. 
16)विभागाच्या अखत्यारीतील कार्यालयांचे वाहन आढावा घेणे. 

अशा एकूण सोळा KRA उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना या परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येत आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियोजनबद्ध कार्यवाही करावी तसेच याबाबतचा मासिक प्रगती अहवाल नियमित आयुक्त शिक्षण यांना सादर करावा आयुक्त शिक्षण व आयुक्त क्रीडा यांनी उपरोक्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने जिल्हानिहाय आढावा वेळोवेळी घेऊन शासनास अहवाल सादर करावा तसेच प्राप्त अहवालानुसार संबंधित कार्यासनानि पूर्ततेबाबत चा मासिक अहवाल शासनाच्या के आर हे प्रणालीवर अद्यावत करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना व निर्देश देखील सदर शासन आदेशानुसार देण्यात आले आहे. 

 वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.