2022-23 हे सत्र "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष" म्हणून साजरे करणार महाराष्ट्र शासन

2022-23 हे सत्र "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष" म्हणून साजरे करणार महाराष्ट्र शासन. 

"कोरोनामुळे उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही आमच्या शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थ्यांचा दारी पोहोचवण्याचे महान कार्य केले. ही यशोगाथा पुढे सुरू रहावी यासाठी २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष" म्हणून साजरे करण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतला आहे."

या अनुषंगाने आज राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यस्तरावर,जिल्हास्तरावर शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि त्यांना चालना देण्यावर भर दिला. 

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम, पोषक वातावरण मिळावे याकरिता अनेक जिल्ह्यांनी खूप सुंदर, कल्पक आणि उपयुक्त असे उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जे उपक्रम राज्यस्तरावर राबविणे शक्य आहेत ते तपासून त्यांना कार्यान्वित करण्याचे निर्देशही महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी शासनाने राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान आणि आदर्श शाळा निर्मिती प्रकल्प हाती घेतले असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याचे निर्देशही शिक्षण मंत्र्यांनी दिले.

याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक सुविधा पुरवल्या जाव्या यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान ५ % निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला आहे. प्रत्येक जिल्ह्याने या तरतुदीचा पुरेपूर आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे निर्देशही दिले. #educatiom #schools

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर वरील ट्विट पाहण्यासाठी.. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.