लोक सेवा हमी कायदा नुसार विद्यार्थ्यांसाठी ३५ सेवा तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून ७० सेवा.

 लोक सेवा हमी कायदा नुसार विद्यार्थ्यांसाठी ३५ सेवा तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून ७० सेवा. 


आज दिनांक 1 मे 2022 पासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांसाठी एकूण 35 लाभांच्या सेवा त्या मिळण्याचा कालावधी त्या सेवा कोणाकडून अपेक्षित आहे मिळाल्या नाही तर कुणाकडे दाद मागावी यासंदर्भात सविस्तर अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे ने एका अधिसूचनेद्वारे जारी केले आहे. 

त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनादेखील एकूण 70 सेवा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत विशिष्ट कालावधी कोणामार्फत मिळतील जर मिळाल्या नाही तर कोणाकडे अपील करायची या संबंधित अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे पुणे अधिसूचनेद्वारे निर्गमित केल्या आहे. 


वरील संपूर्ण अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 हा 2015 पासून लागू करण्यात आला आहे परंतु तेव्हा या अध्यादेशानुसार काही मर्यादित सेवा देण्यात येत होत्या ह्या सेवा एक मे दोन हजार बावीस पासून वाढविण्यात आले आहे व त्यामध्ये अधिकच्या सेवा वाढवण्यात आल्या आहे. 

लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात शिक्षण आयुक्त यांचे पत्र

"शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आधीचे १२ आणि नवीन १०५ आशा एकूण ११७ लोकसेवा आज महाराष्ट्र दिनापासून सेवा हमी कायदा अधिसूचनेनुसार विद्यार्थी, शिक्षक यांना पारदर्शी पद्धतीने आणि विहित मुदतीत देण्यात येतील.सेवांची ही शंभरी गाठण्यासाठी माझ्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन."

अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी आज एक मे दोन हजार बावीस रोजी ह्या सेवांचे लोकार्पण करताना दिली.. 

नव्याने अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये ३५ सेवा विद्यार्थ्यांशी आणि ७० सेवा शिक्षकांशी संबंधित आहेत.आज हिंगोली येथे ध्वजारोहण केल्यानंतर या सेवा लोकार्पण केल्याचा मला अभिमान आहे.येत्या १५ ऑगस्टपर्यंत यामध्ये आणखी सेवांची भर पडेल अशी हमी शिक्षण आयुक्त यांनी आजच दिली. 

तसेच पुढील टप्प्यात यापैकी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतील. देशाचे भवितव्य असणाऱ्या पिढ्या घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करत असतात.त्यांच्या दैनंदिन समस्या जलद गतीने आणि कालबद्ध रितीने सोडविण्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा 'संवाद दिन' आयोजित करणार आहोत. 

संवाद दिन साजरा करणेबाबत शासन आदेश

शेवटी विद्यार्थी हाच शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. या व्यवस्थेला अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत राहू. 

अशा प्रकारची माहिती माननीय शिक्षण मंत्री यांनी ट्विटरवर दिली आहे. 

सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा मानस देखील शिक्षण मंत्री यांनी यावेळी बोलून दाखविला. दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.