जीवनाभीमुख शिक्षण. /खुला शेवट असलेले शिक्षण.. (Open Ended Education)


जीवनाभीमुख शिक्षण..

 खुला शेवट असलेले शिक्षण.. 

(Open Ended Education) शिकून नोकरी मिळवणे हाच शिक्षणाचा उद्देश आहे असा आपला सर्व सामान्य समज आहे. परंतु खरच फ़क्त नोकरी मिळवणे हाच शिक्षणाचा उद्देश आहे का? 

तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला 'नाही' असेच द्यावे लागेल कारण जर तसे असते तर जेवढ्या नोकऱ्या आहेत तेवढ्याच लोकांना शिकवले गेले असते पर्यंत शिक्षण हे सार्वत्रिक आहे त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आहे आणि ते सक्तीचे देखील आहे कारण शिक्षणाचा मूळ स्वभाव हाच जीवनाभिमुख असा आहे मग जर शिक्षण जीवनाभिमुख असते तर जीवनाभिमुखता यात नोकरी कुठेच नाही. मानवी जीवनातील कुत्ते का कार्य करण्यासाठी शिक्षण हे एक तुम्हाला दृष्टिकोन पुरवते आणि आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत कौशल्य आपल्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि हे करण्यासाठी अभ्यासक्रमात याप्रमाणे वेगवेगळे पाठ्य घटक समाविष्ट केले जातात या पाठ्य घटकांचा संबंध आपल्या जीवनाशी जोडून सदर घटक आपल्या जीवनात कोठे कोठे उपयोगी येऊ शकतो तो याबद्दल पूर्ण कल्पना विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे.

गणित विज्ञान भूगोल यासारखे विषय शिकवताना नकळत का होईना परंतु बऱ्याचशा आमच्या बांधवांकडून हे विषय निट असे जीवनाभिमुख करून शिकवले जात नाही असे वाटते विज्ञान विषयातील प्रयोग फक्त प्रयोग शाळेतच केले जातात असे गृहीतक काही जणांच्या मनात आहेत परंतु गणित विज्ञान भूगोल आणि सर्वच विषय हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपण त्यांना आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या विषयात विभागून त्या त्या विषयाचे विशिष्ट ज्ञान सविस्तर घेण्यासाठी वेगवेगळे विषय म्हणून ते शिकतो परंतु मानवी जीवन हे समग्र आहे याचं भानही आपण ठेवायला हवं. उदाहरणच द्यायचं झाल्यास विज्ञानातील एखादं तथ्य जर आपण साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं आणि त्या अच्छा बद्दल मानवी जीवनाशी निगडीत उदाहरणे दिली तर विद्यार्थ्यांच्या लक्षात ते सहज येते आणि जीवन जगत असताना आपण त्या तत्त्वावरील अनेक प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो हे ही विद्यार्थ्यांच्या लक्षात येते परंतु विज्ञान सारखा विषय शिकवताना प्रयोगशाळेतील प्रमाणित साहित्य वापरावे असा पूर्वग्रह आपल्या असतो तसे न करिता दैनंदिन जीवनाची जीवनातील साधने वापरून जर आपण विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखविला तर तो त्यांना अधिक जवळचा आणि अधिक उपयोगी आणि जीवनाभिमुख वाटेल असे वाटते. विज्ञानाच्या विलीनीकरणाच्या पद्धतीमध्ये बरीचशी उदाहरणे आपण पाहतो पुस्तकात दिलेल्या उदाहरणावरून उर्ध्वपातन पद्धती साठी लागणार साहित्य म्हणजे बर्नर, तीवयि, चंचुपात्र, स्टॅन्ड, नळकांडे, दुसरे चंचुपात्र.. इत्यादी साहित्य वापरून आपण उर्ध्वपातन पद्धतीचा प्रयोग विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेत करून दाखवावा असे अपेक्षित असावेत असे वाटते परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांना आपण घरातील कोण कोणत्या गोष्टी उर्ध्वपातन पद्धतीने वेगळ्या करतो हे जर सांगितले आणि घरच्या घरी असलेल्या साधनाने प्रयोग करून दाखविले तर अधिक जीवनाशी निगडित असा प्रयोग होऊन त्यांना ही पद्धती लगेच आणि कशी उपयोगी आहे हे देखील समजेल.

वरील सर्व गोष्टी सांगण्याचे कारण म्हणजे दिलेला पाठ्यक्रम जसाचा तसा न शिकवता, शिक्षकांनी कल्पकतेने जीवनाशी जोडून अधिक जीवनाभिमुख करून शिकवावा अशी अपेक्षा आहे.

यापुढे जाऊन असे वाटते की एखादी संकल्पना शिकवतांना ही संकल्पना जीवनात कशी उपयोगी आहे याची जास्तीत जास्त उदाहरणे देऊन त्यानंतर काही उदाहरणे विद्यार्थ्यांकडून घेऊन आणि अधिक अशी उदाहरणे त्यांना शोधायला सांगून त्यावर त्या संकल्पनेचे उपयोजन कशी होईल किंवा अजून कोणत्या प्रसंगी ही संकल्पना त्यांना जीवनात उपयोगी कसे कशी पडेल याबद्दल विद्यार्थ्यांना विचार करण्यास वेळ देऊन त्या संकल्पनेला फक्त पाठांतर पुरते मर्यादित न ठेवता अधिकाधिक जीवनाभिमुख करून ती संकल्पना त्यांच्या जीवनात किती उपयोगी आहे याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षकांनी दोघांनी मिळून करावे असे वाटते.

वरील प्रमाणे कृती केल्यास शिक्षण हे पुस्तकी ज्ञानाला पुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वासी व त्यांच्या जीवनाशी जोडले कसे जाईल असे प्रयत्न आपण सर्वजण मिळून करायला हवे म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवणे व ते प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी पायाभूत संकल्पना समजून घेऊन त्याचे उपयोजन वेगवेगळ्या ठिकाणी कसे करता येईल याची जाणीव विद्यार्थ्यांना शिक्षणातून व्हायला हवी.

लेखन वाचन अंकगणित यावरील मूलभूत क्रिया या देखील जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे परंतु यापुढे भारतीय परिस्थितीनुसार वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत जे शिक्षण विद्यार्थी घेतात ते त्यांना त्यांच्या पुढील जीवनात कोणत्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय नोकरी अथवा कोणताही रोजगार निर्मिती आणि कुटुंबासाठी त्याच्या पायाभूत क्षमता प्राप्त करून देणारे असावे किंवा तसे ते त्यांना देण्यात यावे म्हणजेच ते शिक्षण घेऊन त्यांच्या जीवनातील कोणतीही वाट ते सहज रित्या निवडू शकतील एवढे ते खुला शेवट असलेले शिक्षण असावे. 

हे घडत असताना विद्यार्थ्याच्या डोक्यात एखादी संकल्पना स्पष्ट होत असताना ती संकल्पना मर्यादित स्वरूपात न ठेवता तिचे जीवनातील व्यापक स्वरूप जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे आणि ह्या छोट्या छोट्या खुल्या शेवट असलेल्या संकल्पना त्यांना जीवनाशी ही सहज रित्या जोडता येतील याची काळजीही ही आपणाला घ्यावी लागेल. जर एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना सर्वांगाने समजली नसेल आणि ती संकल्पना त्याला त्याच्या व्यवसायात वापरायची असेल तर न समजता त्याला ती वापरणे शक्य नाही आणि जर ती योग्य पद्धतीने समजलेली असेल तर त्या व्यवसायात तो अतिशय योग्य पद्धतीने त्या संकल्पनेचा वापर करेल.

म्हणजेच पायाभूत शिक्षण घेताना किंवा प्राथमिक शिक्षण घेताना ज्या ज्या संकल्पना आपण विद्यार्थ्यांना शिकवू त्यांचा शेवट हा बंद असा नसावा म्हणजे ही संकल्पना आणि ती वाचा लिहा पाठ करा आणि पेपरमध्ये लिहिली ती तुम्हाला गुण मिळतील आणि त्यानंतर पुढे काहीच नाही अशा पद्धतीने शिकवलेली संकल्पना म्हणजे शेवट बंद असलेली संकल्पना असे आपण समजू. परंतु शेवट बंद असलेली संकल्पना विद्यार्थ्यांच्या जीवनात कुठे ही उपयोगी की येणार नाही म्हणून प्रत्येक संकल्पना आपण तिचा शेवट खुला ठेवून शिकवावी.. उदाहरणार्थ.. उर्ध्वपातन पद्धती ची अनेक उदाहरणे देऊन जीवनात कोठे कोठे उपयोगी आहे हे समजून सांगितल्यानंतर राहिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना शोधायला सांगितले आणि सर्व उदाहरणे संकलित करून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ती सांगितली तर उर्ध्वपातन पद्धती ही वैज्ञानिक संकल्पना फक्त पुस्तकी न राहता ती अधिक जीवनाभिमुख होईल तिचा शेवट हा खुला राहील म्हणजेच ही संकल्पना ओपन-एंडेड संकल्पना होईल.

वरील पद्धतीने प्रत्येक संकल्पना योग्य त्या या पद्धतीने समजून सांगू ऊन जीवनातील अनेक उदाहरणे त्या संकल्पनेशी जोडून ती संकल्पना अधिकाधिक जीवनाभिमुख झाली म्हणजे ती ओपन इंडेड संकल्पना राहिल. या पद्धतीने शिक्षणातील प्रत्येक संकल्पना जेव्हा ओपन एंडेड पद्धतीने म्हणजेच जीवनाभिमुख पद्धतीने शिकवली जाईल त्याच वेळेस संपूर्ण शिक्षण देखील जीवनाभिमुख होईल त्याला जाणीव होईल की शिक्षण हे आपल्याला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जायला मदत करते आणि उपयोगी देखील ठरते मग तो कुणी नोकरी देईल का याचा विचार न करता स्वतःचा रोजगार निर्माण करून इतरांना देखील नोकरीला ठेवू शकणारा भारतीय नागरिक बनेल यात शंका नाही.

 जर या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेले असेल तर तो कोणत्याही व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो व्यवसायिक अभ्यासक्रम अधिक सहजतेने आणि समजून-उमजून पूर्ण करू शकेल त्याला त्यात अडचण येणार नाही. कारण त्याच्या मूलभूत संकल्पना ह्या स्पष्ट झालेल्या असतील आणि त्या पुढील अधिक परिपूर्ण ज्ञान तो मूलभूत संकल्पनांची जोडून अधिक कौशल्याने आणि सहजतेने समजून घेऊ शकेल.


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! Post a Comment

2 Comments

  1. वर्गात नुसता पाठ्यपुस्तक न शिकविता
    शिक्षकांनी स्वतः कल्पक राहून मुल समजून अध्यापन करणे हेच योग्य आहे आपली पोस्ट प्रेरणादायी वाटली

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.