महाराष्ट्रातील सर्व शाळा भरणार पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने..

 महाराष्ट्रातील सर्व शाळा भरणार पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने.. 

मागील दोन वर्षापासून कोवीड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बरेच दिवस शाळा बंद होत्या त्यानंतर हळूहळू वेगवेगळे निर्बंध घालून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या 24 मार्च दोन हजार बावीस रोजी च्या शासन निर्णयानुसार जवळपास सर्वच निर्बंध शिथिल करून शाळा पूर्ण क्षमतेने तसेच पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिली आहे. 

परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात.. 

Covid-19 परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शाळा पूर्णवेळ तर सुरू करण्यात आलेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी वर्ग एक ते नऊ व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीप्रमाणे एक तीन महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात न घेता ती एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात करण्याचे निर्देश देखील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहे. 

शनिवारी देखिल शाळा पूर्ण वेळ.. 

नियमित शाळा सुरू असताना आठवड्यातील एक बाजाराचा दिवस अर्धा दिवस किंवा सकाळी शाळा असते परंतु covid-19 मुळे शाळा बंद असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवारच्या दिवशी असलेली अर्धा दिवस शाळा देखील पूर्णवेळ करण्याचे निर्देश याच शासनादेश नुसार देण्यात आले आहेत. 

रविवारी देखिल भारणार शाळा.. 

वरील सर्व उपाय करूनही जर वेळ कमी पडत असेल तर शाळांच्या इच्छेनुसार रविवारी देखील शाळांमध्ये वर्ग बनवण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यात शासन निर्णयानुसार दिलेली आहे. 

उन्हाळ्यात देखिल भारणार शाळा..? 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मागील एका पत्रकार परिषदेत उन्हाळ्यात देखील शिक्षकांना शाळा घडवावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे यासाठी उन्हाळ्यात देखील शाळा भरता येईल का याचा विचार करू असे म्हटले होते या पार्श्वभूमीवर यावर्षी हळद देखील शाळा भरण्याची शक्यता आहे. 


शासन निर्णय/आदेश २४ मार्च २०२२👇


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.