RTE नुसार २५% प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात होणार फेब्रुवारी 2023 पासून व आवश्यक कागदपत्रे

  नुसार २५% प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात होणार फेब्रुवारी 2023 पासून.. 


 नुसार २५% प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात होणार फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून पालकांनी या साठी आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवावे म्हणजे सोळा तारखेला अर्ज भरणे सोपे जाईल.. 

प्रवेश अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत..

1) रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा :- यामध्ये रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स टेलीफोन बील, पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी गॅस बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. 
2) सामाजिक वन ची जात संवर्गातील असल्यास प्रमाणपत्र:- यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी /उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. यामध्ये परराज्यातील प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जात नाही.
3)दिव्यांग (अपंग) असल्यास आवश्यक कागदपत्रे:- यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयात 40% पेक्षा जास्‍त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र.
4) HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे:- जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र.
5) आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचा दाखला:- तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयर चा दाखला. (उत्पन्नाची मर्यादा एक लाखापेक्षा कमी) 
6) सर्व प्रवेश पात्र बालकांसाठी जन्माचा दाखला:- यामध्ये ग्रामपंचायत/ नगरपरिषद /महानगरपालिका यांचा दाखला/ रुग्णालयातील एन एम यांचे रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडी रजिस्टरमधील दाखला/ आई-वडिलांचा पालकांनी प्रतिज्ञा द्वारे केलेले स्वयम् निवेदन यापैकी एक कोणताही जन्माचा दाखला.
7)घटस्फोट महिला च्या पाल्यासाठी:- प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची आई जर घटस्फोटीत महिला असेल तर न्यायालयाचा निर्णय/ घटस्फोटीत महिलाचा रहिवासी दाखला.
8) न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्पोटा प्रकरणातील महिलेचे पाल्य असल्यास आवश्यक कागदपत्रे:- घटस्फोटाची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल दुर्बल गटात असल्यास पालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
9)बालकाची आई विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे:- पतीचे मृत्युपत्र /मृत्यू प्रमाणपत्र, बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास पालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल दुर्बल गटात मोडत असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला.
10) एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे:- आई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे.
11 अनाथ  बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे:- बालगृह अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालय ची कागदपत्रे गृहीत धरण्यात यावी जर बालक अनाथालयात राहत नसेल तर पालक त्याचा सांभाळ करतात याचे हमीपत्र आवश्यक राहील.



वरील प्रमाणे आपल्याला लागू असणारे कागदपत्रे तयार ठेवा फेब्रुवारी 2023 पासून पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

खालील हमीपत्र अर्ज करताना पोर्टलवर भरून अपलोड करणे अनिवार्य आहे.


आरटीईनुसार प्रवेश घेण्यासाठी पालकांनी शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी कोण कोणती कार्यवाही करावी या संदर्भात  शिक्षण संचालक यांचे पत्र.. 

Download


ही प्रवेश पकडी प्रक्रिया कशी राबवली जाते या संदर्भात अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

भारत सरकारची राजपत्र👇

Download


महाराष्ट्र शासनाचे राजपत्र👇

Download


Download


वास्तव्याच्या पुराव्या संदर्भात शासन आदेश

Download


अअर्ज भरणे सुरू झाली की नाही याचे संदर्भात नियमित पडताळणी करण्यासाठी ज्या पोर्टलवर अर्ज करायची आहेत त्या पोर्टल ची लिंक आपल्या साठी उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर लिंक वर जाऊन आपण स्वतः अर्ज भरणे सुरू झाली की नाही हे चेक करू शकता.. त्यासाठी समोर दिलेल्या click here युवर टच करा.

click here


पुढील अपडेटेड माहिती साठी गुगल सर्च करा

pradipjadhao.com ला.. 


धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.