वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, राहिलेले वाक्य कसे शोधायचे? How to find Subject, Object, Verb and Complement in the sentence?

 वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, राहिलेले वाक्य कसे शोधायचे? How to find Subject, Object, Verb and Complement in the sentence?

 इंग्रजी भाषेची वाक्यरचना समजुन घेण्यासाठी वाक्यातील वेगवेगळे भाग कसे शोधावे याबद्दल आपण आज माहिती करून घेऊ..

कर्ता - Subject, कर्म - Object, क्रियापद - Verb आणि पूरक/राहिलेले वाक्य - complement हे वाक्याचे मुख्य भाग आहे.

सर्वप्रथम वाक्यातील verb म्हणजेच क्रियापद शोधावे, त्या साठी  वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्द शोधुया..

उदा.

Jivan writes him a letter this evening.

वरील वाक्यात लिहिणे ही क्रीया घडली आहे त्यामुळे writes हे क्रियापद आहे.

आता वाक्यातील इतर भाग शोधणे सोपे जाईल. क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाला काही प्रश्न विचारले की आपणास इतर भाग सापडतात.

क्रियापद कोण who ने प्रश्न विचारल्यास कर्ता सापडतो.

वरील वाक्यात who writes? कोण लिहितो? या प्रश्नाचं उत्तर Jivan असे मिळते..

Jivan writes him a letter this evening.

म्हणजे वरील वाक्यात Jivan हा कर्ता subject आहे.

क्रियापदाला काय what ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे प्रत्यक्ष कर्म सापडते.

वरील वाक्यात काय लिहितो? What writes? असा प्रश्न विचारल्यास उत्तर a letter हे मिळते ते वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे.

Jivan writes him a letter this evening.

क्रियापदाला कोणाला whom ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असते.

वरील वाक्यात कोणाला लिहितो? Whom writes? या प्रश्नाचं उत्तर him हे मिळते म्हणजेच वाक्यात him हे अप्रत्यक्ष कर्म आहे.

Jivan writes him a letter this evening.


क्रियापदाला कसं? केंव्हा? कोठे? कधी? या शब्दांनी प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे राहिलेले वाक्य असते.

Jivan writes him a letter this evening.

वरील वाक्यात केंव्हा लिहिले? When writes? असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर this evening हे वाक्यातील राहिलेले वाक्य आहे.

इतर शब्दांनी प्रश्न विचारल्यास उत्तर मिळत नाही पूरक वाक्य शोधण्यासाठी एक एक करून केंव्हा, कसे, कधी, कोठे या शब्दांनी प्रश्न विचारावे लागेल.

वरीप्रमाणे जर आपण वाक्याचे भाग शोधले आणि वाक्याचे सूत्र तयार करायला गेलो तर वाक्याचे सूत्र असे तयार होईल.

S + HV + MV + IO + DO + C + .

S = subject (कर्ता)

HV = Helping Verb (सहाय्यकारी क्रियापद असल्यास)

MV = Main Verb (मुख्य क्रियापद)

IO = Indirect object (अप्रत्यक्ष कर्म)

DO = Direct Object (प्रत्यक्ष कर्म)

C = Complement (राहिलेले/ पूरक वाक्य)

. = Full Stop (पूर्ण विराम)

हे सर्व आपणास पुढील व्याकरण शिकतांना वाक्यावर क्रीया करतांना उपयोगी ठरतात..


संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com या ब्लॉग ला..


धन्यवाद.

Post a Comment

4 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.