दिवाळी शुभेच्छा, Diwali greetings,

खालीलपैकी कोणताही दिवाळी शुभेच्छा संदेश copy करा त्यात आपले नाव टाका आणि आपल्या प्रियजनांना पाठवा.
आपल्या साठी वेगवेगळे संदेश उपलब्ध आहेत.👇

संपू दे अंधार सारा
                 उजळू दे आकाश तारे
            गंधाळल्या पहाटेस येथे
                   वाहू दे आनंद वारे....

             जाग यावी सृष्टीला की
                    होऊ दे माणूस जागा
             भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
                    घट्ट व्हावा प्रेम धागा...

             स्वच्छ सारे मार्ग व्हावे
                 अन् मने ही साफ व्हावी
              मोकळ्या श्वासात येथे
                जीवसृष्टी जन्म घ्यावी...

              स्पंदनांचा अर्थ येथे
                      एकमेकांना कळावा
             ही सकाळ रोज यावी
                 माणसाचा देव व्हावा......
        
 🪔 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

       पेट्रोलच्या दराप्रमाणे सुख वाढू दे,
डिझेलच्या भावाप्रमाणे समृद्धी वाढू दे,
गॅसच्या रेटप्रमाणे भरभराट होऊ दे,
GST प्रमाणे समाधान वाढू दे,

GDP प्रमाणे नकारात्मकता,चिंता,समस्या कमी होऊ दे,

सर्वांना दिवाळीच्या कोटी कोटी(लस आकड्या प्रमाणे 100 कोटी) शुभेच्छा!
☺️🕉️ नमस्कार, 🙏
दीपावलीच्या या मंगल पर्वावर आपणा सर्वांना
 धनत्रयोदशी- निरामय आयुष्य, 
नरकचतुर्दशी- षड्विकारांपासून अलिप्त,
लक्ष्मीपूजन- धनधान्याने संपन्न, समृद्ध,  
बलिप्रतिपदा- बलिच्या चांगुलपणाचे अन् भाऊबीज- विश्वबंधुत्वाच्या आनंदाचे

आयुष्य आपणा सर्वांना प्राप्त होवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🙏🏻

पर्यावरण पुरक दिपावली साजरी करू या!🌳🌴
एक तरी झाडाच्या रोपाचे संवर्धन संगोपन करू या! 🌳🌴लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!💐💐💐💐💐
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!💐💐💐💐💐
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 🌹🙏
ज्याचा चेहेरा उटण्यापेक्षा शिकवलेल्या मुलांना समजल्याने उजळतो,
अंगणातील दिव्यांपेक्षा मुलांचे भविष्यातील यश भावते,
नव्या कपड्यांपेक्षा नविन संकल्पना समजाऊन देणे आवडते
फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा उत्तराची आतिषबाजी ज्यांना आवडते,
ओवाळणी पेक्षा विद्यादानाची ज्यांना आवड असते
आणि फराळापेक्षा सुद्धा ज्याला पिढी घडवण्याची भूक असते
अश्या माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
🙏🏻🙏🏻💥🎉🎊🥳🙏🏻🙏🏻

🍁
-


मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना
अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना।
कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना,
दुःख ओले दोन अश्रू, माणसांचे माणसांना।।

_या विंदांच्या काव्य ओळींप्रमाणे सर्वांची दिवाळी तेजोमय होवो...अंधारात असलेल्यांना उजेडाची तिरीप लाभो..हीच सदिच्छा.._

शुभ दीपावली

🍁


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!💥💥 ही दिपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटीची जावो
 दिपावलीच्या _शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा 🪔
|| शुभ दिपावली ||🏮🏮
_
*दिवाळी मनात असते.......*

आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरुपं!

एकमेकांबद्दल मनातून वाटणा-या भावनांची ती केवळ प्रतिकं असतात...

*खरी दिवाळी असते मनामनात.........!*

*एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा*
*हीच खरी दिवाळी मनामनाची ......!*

*म्हणूनच ह्या शुभेच्छा दिवाळीच्या*
*मनाकडून - मनांकडे!*

*आपणांस व आपल्या कुटुंबीयांस दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा* वसुबारस पासून ते भाऊबीज पर्यंत! 

💥✨🍥🎊💥✨💫

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🏵️🪴🌈🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉 *  दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*
        
          *🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१नोव्हेंबर*  पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!
*१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*
        *🕯🪴🏵️|| शुभ दीपावली ||🕯🪴🏵️*


 🙏*  आजपासून सुरू होणाऱ्या  दीपावली पर्वाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा*
*सोमवार, 01.11.21- वसुबारस*
*मंगळवार, 02.11.21- धनत्रयोदशी*
*गुरूवार, 04.11.21 नरकचतुर्दशी व   लक्ष्मीपूजन*
*शुक्रवार 05.11.21- दीपावली पाडवा*
*शनिवार 06.11.21- भाऊबीज. 🙏🙏. आपल्या घरातील सर्व जण निरोगी व आनंदी  असोत ह्याच सदिच्छा*🙏🙏
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒟𝒾𝓌𝒶𝓁𝒾 🙏🙏

*दीपावली पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा*
*सर्व मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्व परिवारास, हि दिवाळी आनंदमय व चैतन्यमय जावो*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.