स्वलिखित कविता!

प्रयत्न


होय बा इथे मी 

राहतो सुखाने

तुझा तूच जाणे

दैवयोग!


प्रयत्न करून

प्रामाणिक मन

जगतो जीवन

मौजेसुखे!


कुणा इथे भेटे

देव कोण एक

माझेहो निर्मीक

मायबाप!


शिवबा जोतीचा

राहतो पाईक

वागतो मी नेक

व्यवसायी!


जो तो करतोहो

आपुल्या मनाची

ठेवतो जनाची

तोचि धन्य!


कुठे उरलेहो

प्रेम नी विश्वास

सुखे दोन घास

माऊलीला!


लोक येथ असे

जुगाडू अनेक

अकाउंट फेक

फेसबुकी!
प्रदिप जाधव 🙏आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत..🙏

Post a Comment

16 Comments