निवृत्ती वेतन धारक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भातील ते पत्र रद्द..

निवृत्ती वेतन धारक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भातील ते पत्र रद्द..


 नागपूरच्या कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतनासंदर्भात बँकांना दिलेले एक पत्र गेल्या दोनचार दिवसात व्हायरल झाले आणि राज्यभरातील निवृत्तीवेतनधारकांमध्ये एकच गोंधळ उडाला. ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपलं जमा झालेलं निवृत्तीवेतन बँक खात्यातून काढलं नसेल, त्या सर्व रकमा सरकारजमा कराव्या, असे आदेश बँकांना देणारं ते पत्र होतं. मिळालेली सर्वच पेन्शन संपवली जात नाही. अडीअडचणी, आजारपण, आकस्मिक खर्च यासाठी बचत करुन ती पेन्शन खात्यात ठेवली जाते. पण अशी सगळी रक्कम आता सरकार परत घेणार या कल्पनेने सगळेच धास्तावले. पण या पत्रामुळे राज्यभरात उडालेला गोंधळ लक्षात घेऊन लेखा व कोषागार संचालनालयाचे कार्यतत्पर संचालक श्री. वैभव राजेघाटगे यांनी ११ नोव्हेंबरला सविस्तर आणि स्वयंस्पष्ट पत्र काढून सगळा संभ्रम मिटवून टाकला. नागपूर कोषागाराने काढलेले ते पत्रही रद्द करण्यात आले.


नागपूरच्या कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतनासंदर्भात बँकांना दिलेली पत्रे 👇






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.