शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य! शिक्षण संचालक आदेश 09/02/2026

शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय

डॉ अॅनी बेंझट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे४११००१-

दिनांक- 09 FEB 2026

प्रति, 

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व

३. प्रशासन अधिकारी महानगरपालिका, सर्व

४. शिक्षण निरीक्षक दक्षिण, पश्चिम, उत्तर (बृहन्मुंबई)

विषय - शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत

संदर्भः १. सिव्हील अपील क्र.१३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दि.१/९/२०२५ रोजीचा न्यायनिर्णय

२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/निवेदन/टे-३०१/२०२५/दि.४/११/२०२५

३. शासनाचे पत्र क्र संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७९१/टीएनटी-१/दि.१९/१/२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदर्भ क्र. १ येथील सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षक) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदांमार्फत मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

तरी सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संबधी शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून त्यावावतचे अभिप्राय अद्याप अप्राप्त आहेत.

तथापि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण या अर्हतबरोबरच पदोन्नती साठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. असे शासनाचे सदर्भ क्र.३ नुसार कळविण्यात आलेले आहे. तरी शासन पत्रात नमूद निर्देशानुसार यथानियम कार्यवाही करण्यात यावी.


Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 09-02-2026 18:42:32

( शरद गोसावी )

 शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-१

 


शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे. 

क्रमांक : संकीर्ण २०२५/प्र.क्र. ७९१/टीएनटी-१

दिनांक : १९जानेवारी, २०२६.

प्रति,

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत.

संदर्भ

: १. सिव्हील अपील क्र. १३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. ०१.०९.२०२५ रोजीचा न्यायनिर्णय.

२. आपले पत्र क्र. प्राशिसं/निवेदन/टे-३०१/२०२५, दि.०४.११.२०२५

महोदय, संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरुन योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये आपण केली आहे. सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत.

२. संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णय पारीत झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत.

३. सदर पत्र विधि व न्याय विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. २४५/२०२५/अ-शाखा, दि. ०६.०१.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे.


आपला

SHARAD SHRIPATRAO MAKNE

(शरद माकणे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.