महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करून तुकडीवाढीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी कालमर्यादा आखून देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
आदिम जाती जमाती बहुद्देशीय शिक्षण संस्था, अमरावती यांनी मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ६७९०/ २०१८ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.३१.०१.२०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार नवीन तुकडी सुरू करण्याचे प्रस्तावांवर शासनाने प्रत्येक वर्षाच्या दि. ३० एप्रिल पर्यंत निर्णय घ्यावा, जेणेकरून शैक्षणिक संस्था विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकतील. यानुषंगाने तुकडीवाढ संदर्भातील प्रस्ताव विहित वेळेत मंत्रालय स्तरावर उपलब्ध व्हावेत या दृष्टीने उक्त प्रस्ताव प्राप्त होण्याकरीता वेळापत्रक / कालमर्यादा आखून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
रिट याचिका क्र. ६७९०/ २०१८ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.३१.०१.२०२५ रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करून तुकडीवाढीसंदर्भातील प्रस्ताव खालील वेळापत्रकान्वये संबंधित कार्यालयांकडे सादर करण्यात यावेत.
१. तुकडी वाढ / इ. ५ वी व इ. पर्यंत ८ वी वर्गवाढ
शिक्षणाधिकारी
दि. ३१ ऑगस्ट
विभागीय उप संचालक
दि. ०१ सप्टेंबर ते दि.३१ ऑक्टोबर
शिक्षण संचालक
दि. ०१ नोव्हेंबर ते दि. ३१ डिसेंबर
मंत्रालय स्तर
दि.०१ जानेवारी ते दि.०१ मार्च
२. तसेच आगामी शैक्षणिक वर्षांपासून जे परिपूर्ण प्रस्ताव वरील वेळापत्रकानुसार दि. ०१ मार्च नंतर मंत्रालय स्तरावर प्राप्त होतील, अशा प्रस्तावांवर पुढील शैक्षणिक वर्षात कार्यवाही करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०४२९१२५२०६१८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(समीर सावंत)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे/अतिरिक्त तुकडी मंजूर करणे/माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
वाचा -
१) गृह विभाग, शासन अधिसूचना क्र. एमव्हीआर-०८०८/प्र. क्र. १५३/परि-२, दि. २२ मार्च, २०११ (महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करीता विनियम), नियम २०११)
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. पीआरई-२००८/ (५०६/११)/ प्राशि-१, दि.१४ सप्टेंबर, २०११
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण १११७/ प्र.क्र.८०/एस. एम-१, दि. ०५ मे, २०१७
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/ प्र.क्र.३९/ एसडी-४, दि. १० मार्च, २०२२
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः सुरक्षा-२०२४/ प्र.क्र.२४३/ एसडी- ४, दि.२१ ऑगस्ट, २०२४
प्रस्तावना -
शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे / अतिरिक्त तुकडी मंजूर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. याकरीता शासनाने विविध उपाययोजना आखल्या आल्या आहेत. अलिकडील काळातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घडलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे विविध शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त होण्या-या शाळा मान्यता / दर्जावाढ / नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या करणे / माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक -
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी शासनाकडे शाळा मान्यता / दर्जावाढ / नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे/ अतिरिक्त तुकडी मंजूर करणे / माध्यम बदल इत्यादी बाबत सादर करण्यात येणारे प्रस्ताव विहित तपासणी सूचीसह सोबतच्या जोडपत्र अ सह सादर करावेत. सदर "जोडपत्र-अ" सह विहित पद्धतीने प्राप्त होणा-या प्रस्तावांवरच संबंधित कार्यासनांनी यथोचित कार्यवाही करावी.
२. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकांमध्ये खाजगी वाहनांद्वारे क्षमतेइतक्याच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी.
३. ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फ़त वाहतूक व्यवस्था केली जाते त्या ठिकाणच्या वाहन चालक व वाहक यांच्यासाठी जाणीवजागृती करण्याचे कार्यक्रम परिवहन विभागाने राबवावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९२४१६३६२३७९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(मान्या कदम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
१. अपर मुख्य सचिव (परिवहन), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. प्रधान सचिव (शालेय शिक्षण), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
सुधारित तपासणी सूची. .
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments