PM Poshan Students Enrollment 2024-24 update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत एमडीएम पोर्टलवर विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत करण्याबाबत.

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११ ००१. कार्यालयातून दिनांक 10 July 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत एमडीएम पोर्टलवर विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत करण्याबाबत १. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येत आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाची माहिती शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एमडीएम पोर्टलवर शाळा स्तरावरुन भरणे आवश्यक आहे. याबाबत माहे एप्रिल, २०२४ पासून संचालनालयामार्फत वेळोवेळी आवश्यक लेखी स्वरुपात तसेच ऑनलाईन बैठकादवारे आपणास सुचना देण्यात आलेल्या आहेत. योजनेंतर्गत पात्र शाळांनी एमडीएम पोर्टलवरील शाळा लॉगिनमध्ये सन २०२४-२५ करीताची विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत केलेली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत केंद्र आसनाकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. आपल्या अधिनस्त योजनेस पात्र शाळांना एमडीएम पोर्टलमधील विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत करण्याच्या सुचना देण्यात याव्यात.

२. योजनेस पात्र विद्यार्थी संख्या (Enrollment) एमडीएम पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी दि.१९/०७/२०२४ पर्यंत कालावधी निश्चित करुन देण्यात येत आहे. प्रस्तुत बाबत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.

३. शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ अथवा घट झाल्यास याबाबतची माहिती शाळा स्तरावरुन एमडीएम पोर्टलवर अद्ययावत केली जाईल याबाबतच्या सुचना शाळांना देण्यात याव्यात.

४. एमडीएम पोर्टलमध्ये विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत न केल्यामुळे शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.

५. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या दैनदिन लाभाची माहिती एमडीएम पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे शाळा स्तरावर देण्यात आलेल्या दैनंदिन लामाची माहिती एमडीएम पोर्टलवर भरली जात असल्याची खातरजमा आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.

६. आपल्या कार्यक्षेत्रतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात नसल्याबाबतची दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System (AMS) प्रणालीद्वारे संचालनालयास प्राप्त होत आहे. सदरची बाब गंभीर स्वरुपाची असून विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास क्षेत्रीय अधिकारी/केंद्र प्रमुख यांना संबंधित शाळेवर पाठवून त्याच दिवशी अहवाल प्राप्त करुन घेऊन आवश्यक उपाययोजनात्मक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

७. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शाळा स्तरावरील लाभार्थ्यांची माहिती एमडीएम पोर्टलवर दररोज भरली जाईल याकरीता आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सदरची माहिती भरली जात असल्याबाबतचा तालुका स्तरावरुन आढावा घेण्यात यावा. शासन/संचालनालयाने ऑनलाईन कामकाजाबाबत वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव मा.आयुक्त (शिक्षण) यांचेकडे सादर करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)


प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.