राज्य सरकारकडून विविध मॅट्रिकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरून राबविण्यात आली आहे. 'राईट टू गिव्ह अप' हा पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने अर्ज दुरुस्त करून ते पुन्हा सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनेअंतर्गत नवीन व नूतनीकरणाचे अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर भरण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सोडून देण्यासाठी 'राईट टू गिव्ह अप' हा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना अर्ज भरताना नजरचुकीने 'राईट टू गिव्ह अप' हा पर्याय निवडला असेल तर त्यांची शिष्यवृत्ती रद्द होते.
ज्या विद्यार्थ्यांचे अनावधानाने त्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील, केवळ अशा विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे ३० जून २०२४ पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून, आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बँक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक आहे. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहणार आहे.
■ शिष्यवृत्ती अर्ज भरत असताना ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने 'राईट टू गिव्ह अप' हा पर्याय निवडला असेल, तर त्यांना शासनाने संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी तत्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज 'रिव्हर्ट बॅक' करून ऑनलाईन सादर करावेत. गरजू विद्यार्थ्यांनी दिलेल्या संधीचा फायदा करून स्वतःचे नुकसान टाळावे असे आवाहन सहायक समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments