बदली अपडेट - १९ मे २०२४ ला लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रात शेवटचा टप्पा! २० मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला

19 मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असणार आहे त्यामुळे त्यानंतर आचारसंहिता शिथील होऊ शकते. व अनेक प्रशासकीय कामांना गती येऊ शकते त्यापैकी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील सदर आचारसंहिता काळात होतील का याबाबत उत्सुकता आहे. 


जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला २० मेनंतर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने २०१६ च्या निर्णयानुसार सर्व तयारी करून ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र जिल्हा कर्मचाऱ्यांची यादी तयार असली तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावर मर्यादा आल्या असून, मराठवाड्यातील सर्व आठ लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि. १३) संपले. आता २० मेनंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतून ढिल मिळण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व तयारी करून ठेवली.

जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांना आणखी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागून राहिली असून, एकदा बदल्या झाले की निवांत होते; मात्र, आचारसंहितेची लक्ष्मणरेषा मधेच आल्याने कर्मचाऱ्यांना सबुरीने घ्यावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी सोयीच्या विभागात बदल्या करून घेण्यासाठी हलचाली सुरू केल्या असून, त्यावर प्रत्यक्षात शिक्कामोर्तब होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागून राहिली आहे. तरी सुद्धा २० मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


जून मध्ये लोकसभा आचारसंहिता नंतर लगेच शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या परंतु दिनांक 14 मे 2024 रोजी निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सदर निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले आहे त्यामुळे जरी लोकसभा आचारसंहिता कालावधीत बदल्या झाल्या नाहीत तरी सहा जूनच्या लोकसभा आचारसंहिता संपल्या नंतर बदल्या होऊ शकतात.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.