पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट दिनांक 14/05/2024 रोजीचे अपडेट! शिक्षक व पदविधर निवडणूक आचारसंहिता पुढे

 पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट

आजचे (14/05/2024) अपडेट



* राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक ०८/०५/२०२४ रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरती साठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक १०/०५/२०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

------------------------------------------



* दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक १४/०५/२०२४ रोजीच्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही

* त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे (Google Sheet) माहिती संकलित करण्याच्या सुबना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे. शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक १०/०५/२०२४ रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये काही जिल्हयांनी त्यांच्याकडील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या, त्या सोडविण्यासाठी शासनाकडे अडचणींबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे.

------------------------------------------

* संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत. त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्या त्या प्रमाणे बुलेटीन निर्गमित केले जात आहे.

* महाराष्ट्र राज्यात दिनांक 19 मे ला मतदानाचा शेवटचा टप्पा आहे त्यानंतर आचारसंहिता शिथील होऊन होऊन पुढील प्रक्रियेला वेग येतो का हे देखील महत्त्वाचे ठरेल. 

* अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यातः येत आहे. त्यामुळे संभ्रम अथया निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.