या मतदान केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लीअर न करताच घेतले मतदान! ...तर..मतमोजणी नाही.

वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार एका मतदान केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लिअर न करता मतदान घेतल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणतात, 'त्या' केंद्रावरील मते मोजणार नाही. 


नागपूर लोकसभा मतदार संघातील एका बूथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेल्याची माहिती मतदानाच्या तब्बल ३५ दिवसांनंतर समोर आली आहे. या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.


लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. मात्र, निवडणूक यंत्रणेतील त्रुटी संपताना दिसत नाहीत. मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारूप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिझल्ट क्लीअर करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते. मात्र प्राप्त माहितीनुसार मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आले.


विजयाचा फरक ३१५ पेक्षा जास्त असेल तर मतमोजणी नाही


केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या बूथवरील मतदानासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला आधीच कळविण्यात आली आहे. फॉर्म १७ सी मधील नोंदीनुसार या बूथवर ३१५ मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार त्या केंद्रावरील मतमोजणी होणार नाही. जर विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्या मतातील फरक ३१५ मतांपेक्षा कमी असेल तर मतमोजणी होईल. त्यापेक्षा जास्त फरक असेल तर मतमोजणी करणार नाही.


- प्रवीण महिरे, निवडणूक उपजिल्हाधिकारीमहत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. निकालातून मॉक पोल मतदान अहवालातील नोंदवलेले मतदान वजा करणै अथवा vvpat पावती मोजणे ...

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.