NPS खात्यातून कोणती व किती रक्कम काढता येते? कोणत्या कारणासाठी करता येते? आवश्यक कागदपत्र, ती परत करावी लागते का?

 एक नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना एम पी एस ही योजना लागू आहे. त्या खात्यातून कर्मचाऱ्यांना कोणती व किती रक्कम काढता येते? ती कोणत्या कारणासाठी काढता येते? व ती परत करावी लागते का? याबाबत स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.


डी सी पी एस / एन पी एस खात्यातुन परतावा (म्हणजेच काढलेली रक्कम परत करावी लागते) रक्कम खालील कारणासाठी काढता येते. त्यासाठी समोर दखविण्यात आलेली कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर रक्कम ही कर्मचारी यांचे खात्यात जमा असलेल्या एकुण रक्कम पैकी त्यातील शासनाच्या हिस्याची जमा रक्कम व एकुण जमा व्याज रक्कम वजा जाता केवळ आपल्या हिस्याच्या जमा रक्कमे पैकी जास्तीत जास्त २५ टक्केच रक्कम काढता येते.

म्हणजे एक लाख रुपये कर्मचारी हिस्स्याचे असतील व एक लाख 40 हजार रुपये शासन हिस्स्याची जमा असतील तर कर्मचारी हिस्स्यतील 25 टक्के म्हणजेच एक लाखांपैकी 25000 रुपये काढता येतात तेही परत करावे लागतात.

सदर रक्कम पुढील कारणासाठी काढता येते.

1) स्वतःसाठी घरबांधणी घर खरेदी साठी

१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) नोंदणीकृत करारनामा / जुने घर असल्यास घरपट्टी व स्थानिक प्राधिकारी यांचे ना हरकत दाखला ३) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ४) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) बँकेचे शिल्लक हप्ते बाबतचे स्टेटमेंट वरील सर्व कागदपत्रे मुळ + एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.

2) मुलांना उच्चशिक्षण घेणे साठी.

१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) प्रवेश निवड यादीची प्रत ३) मुलाचे बोनाफईड ४) प्रवेश घेणा-या संस्थेचे फी बाबत अंदाजपत्रक ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत - वरील सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळ + एक प्रत) कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.

3) मुलांच्या लग्नासाठी.

१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) लग्नाची पत्रीका ३) कुटुंबाचा दाखला ४) मुलाचे आधारकार्ड ५) लग्नाच्या खर्चाचे अंदाजपत्रक ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.

4) कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या आजारपणासाठी.

१) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रह केलेला धनादेश ३) दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक ३) कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.

5) कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या कोवीड- १९ आजारपणासाठी.

1) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक ३) कोवीड - १९ असलेबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र ४) कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मूळ + एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे.



एनपीएस खात्यातून अंशतः रक्कम काढण्यासाठी कोरा पीडीएफ अर्ज.👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.