काही दिवसापूर्वी दिल्ली इलेक्शन कमिशनच्या एका वायरल झालेल्या परिपत्रकानुसार निवडणूक मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष यांना मानधन किती मिळेल त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांना फक्त 350 किंवा 250 एवढे मानधन मिळेल असे वाटत होते.
परंतु सदर परिपत्रकामध्ये एकूण सर्व भत्ते मिळून किती मानधन मिळणार याबाबत स्पष्टता येत नव्हती.
अर्थात अजूनही निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नेमके मानधन व इतर भत्ते किती मिळतील नवीन परिपत्रक निर्गमित केले नाही.
परंतु या अगोदर झालेल्या निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष व मतदानाची इतर अधिकारी यांना पुढील कोष्टकानुसार निवडणूक मानधन व इतर भत्ते दिले गेले होते.
त्यानुसार मतदान केंद्राध्यक्ष ला एकूण 1700 रुपये.
मतदान केंद्र अधिकारी क्रमांक एक यांना एकूण 1300 रुपये
मतदान केंद्र अधिकारी क्रमांक दोन यांना एकूण 1300 रुपये.
व मतदान केंद्र अधिकारी क्रमांक तीन यांना एकूण 1300 रुपये एवढे मानधन देण्यात आले होते.
वरील परिपत्रकानुसार चतुर्थ कर्मचारी याला देखील एकूण सहाशे रुपये मानधन देण्यात आले होते पोलीस शिपाई याला 800 रुपये मदतनिसाला चारशे रुपये अंगणवाडी सेविका यांना चारशे रुपये तर पाणी वाटप करणाऱ्याला एकूण तीनशे रुपये एवढे मानधन देण्यात आले होते.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments